आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातच करा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Purandar International Airport
आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातच करा!

आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातच करा!

पिंपरी : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Purandar International Airport)जागेची मान्यता केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने रद्द केली आहे. त्यामुळे नव्याने जागेचा शोध घेतला जात आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडलगतच्या खेड तालुक्यातच विमानतळ(Airport) व्हावे, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

हेही वाचा: पुणेकर संस्थेच्या पुढाकाराने काश्‍मीरमधील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात अभ्यास दौरा

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील तळेगाव-चाकण- रांजणगाव येथील इंडस्ट्रिअल हब आणि पिंपरी-चिंचवडमधील रेसिडेन्सिअल कॉरिडॉरच्या दृष्टीने भविष्यातील २५ वर्षांचा विचार करता खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हावे, अशी आमची मागणी आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले. पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airport)होणे गरजेचे आहे.

हेही वाचा: पुन्हा महाविद्यालये बंद, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर अनेक प्रश्‍न ?

गेल्या १० वर्षांपासून विमानतळाचा प्रश्न प्रलंबित होता. राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारने पुरंदर येथील जागेची निवड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने जागेत बदल केला. आता संरक्षण मंत्रालयाने ‘साईट किल्अरन्स’ नाकारला आहे. त्यामुळे खेड तालुक्यातच विमानतळ व्हावे, असेही लांडगे यांनी सांगितले.(Pune news)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pimpri
loading image
go to top