
वीजप्रश्नी महाविकास आघाडी अपयशी
तळेगाव दाभाडे, ता. २५ : वीज प्रश्नी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारने वीज दरात पंचवीस टक्के केली. शिवाय भारनियमन करून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले आहे. सुरक्षित ठेवीच्या नावाखाली जनतेची लूट केली जात असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आघाडी सरकारवर केला.
भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भेगडे यांनी सरकारच्या उणिवांवर बोट ठेवले. विशेषतः भारनियमन करून नागरिकांची होणारी गैरसोय त्यांनी अधोरेखित केली. सरकार जाणीवपूर्वक भारनियमन करीत आहे. आघाडी सरकारने वीज निर्मितीचे कारखाने बंद पाडले आहे, याकडे लक्ष वेधले. केंद्र सरकारकडून वीज निर्मितीसाठी कोळसा पुरवठा केला. त्याचे थकीत बिल राज्य सरकार केंद्राला अद्याप देऊ शकले नाही. मावळ तालुक्यातील रेल्वेशी संबंधित असलेल्या प्रलंबित प्रश्नासाठी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेऊन, वडिवळे, वडगाव सांगवी, बेगडेवाडीतील भुयारी मार्गाच्या कामातील त्रुटी दूर केल्या जातील, असेही भेगडे यांनी सांगितले. मळवली, तळेगाव स्टेशन, पिंपरी-चिंचवड हद्दीतील रेल्वे स्टेशन लगतच्या बांधकामांना रेल्वे प्रशासनाने नोटीस दिल्या. त्या बांधकामावर लगेच कुठलाही कारवाई केली जाणार नसल्याचे दानवे यांनी सूचना दिल्या असल्याचे भेगडे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..