मंगलम लॅन्डमार्क्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगलम लॅन्डमार्क्स
मंगलम लॅन्डमार्क्स

मंगलम लॅन्डमार्क्स

sakal_logo
By

डुडुळगावातील सुवर्णसंधी
----------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा अनेक क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला होता. त्यातच सर्वाधिक फटका हा बांधकाम क्षेत्रालाही झाल्याचं सांगण्यात आलं होतं. तरीदेखील डुडुळगाव येथे घरांच्या विक्रीत झालेली वाढ पाहण्यात येते. याचे कारण डुडुळगावचे भौगोलिक स्थान आणि वाढते आधुनिकीकरण असू शकते.
डुडुळगाव हे आळंदी-देहू यांसारख्या पुण्यभूमींच्या सानिध्यात असल्याने त्याला लाभलेला आध्यात्मिक वारसा प्रकर्षाने जाणवतो. आजूबाजूला असलेला निसर्गरम्य डोंगर, नद्यांनी वेढलेला परिसर डुडुळगावच्या सौंदर्यात भर घालतात. उत्तरेला असलेला उतार/पाणी आणि दक्षिणेला असलेला चढ/डोंगर यातून डुडुळगावचा नैसर्गिकरित्या असलेला वास्तुशास्त्र पूरक परिसर लक्षात येतो. तसेच विकसित रस्ते, हाकेच्या अंतरावर असलेले मोशी मार्केट, डीमार्ट, मनोरंजन केंद्रे तसेच MIT, RJSPM, ICIS, City Pride, श्री श्री रविशंकर यासारखी नामांकित शिक्षणकेंद्रे डुडुळगावचा शैक्षणिक व आर्थिक पगडा उंचावतात. पिंपळे सौदागरपासून अवघ्या १०-१५ किलोमीटरवर असलेले डुडुळगाव लोकांना भविष्यातील गुंतवणुकीचा उत्तम मार्ग म्हणून सामोरं येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आराखड्यानुसार डुडुळगावमध्ये सिंगापूर येथे स्थित असलेल्या स्यांटोसा थिम पार्कच्या धर्तीवर भव्य असे सफारी पार्क उभारण्यात येणार आहे. डुडुळगावच्या सभोवताली चाकण, तळवडे, भोसरी, मरकळ, खेड अशा विविध एमआयडीसी आहेत तसेच तळवडे आयटी पार्क देखील आहे. पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत असूनदेखील परिसरातील शांतता, उत्तम पायाभूत सुविधा, लगतच असलेला पुणे-नाशिक महामार्ग आणि लोहगाव विमानतळ डुडुळगावला वेगळेपण मिळवून देते. अवघ्या ३ किमीच्या अंतरावर २५० एकर परिघात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र उभारण्यात येत आहे तसेच चाकण ते हिंजवडी असा मेट्रो प्रकल्प देखील चालू होत आहे. या सर्वामुळे डुडुळगावला जागतिक दर्जा प्राप्त होत आहे.
हिंजवडी-तळवडे यांसारख्या आयटीनगरीत असलेला सुशिक्षित वर्ग देखील डुडुळगावमध्ये स्थायिक होताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे मग त्यामागील कारण लॉकडाऊनमुळे सुरु असलेले ‘वर्क फ्रॉम होम’ असो किंवा मग पिंपळे सौदागर, बाणेर, वाकड यांसारख्या शेजारील गावांशी तुलना करता घरांची ५० टक्क्यांनी कमी होणारी किंमत असो किंवा मग डुडुळगावचे भविष्यातील वाढत जाणारे महत्व लक्षात घेता आज योग्य वेळी केलेली गुंतवणूक असो. येथे जर आत्ता गुंतवणूक केली तर भविष्यात यापासून मिळणारी वाढ ही पिंपरी चिंचवड परिसरातील मिळणाऱ्या सर्वांत जास्त वाढीमध्ये असेल याबद्दल शंकाच नाही. डुडुळगाव परिसराच्या आजूबाजूला सर्व बांधकामे ही नियमित केलेली दिसतात. कुठेही बकालपणा किंवा विनापरवाना असलेली बैठी घर दिसत नाहीत. प्लॉटिंग देखील महापालिकेच्या परवानगीने असल्यामुळे नियमाने रस्ता, वीज व सांडपाण्याची व्यवस्था केलेली दिसते.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डुडुळगाव परिसरात कोठेही झोपडपट्टी नाही. त्यामुळे देखील सुशिक्षित वर्ग येथे आकर्षित झालेला दिसतो. डुडुळगावमधील बरेचसे आरक्षणे अजूनही ताब्यात घेतलेली नाहीत. भविष्यात ती ताब्यात घेऊन त्यावर देखील खूप मोठमोठे विकसनशील प्रकल्प होऊ शकतात, त्यामुळे देखील डुडुळगावकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. वाढती महागाई ही बाब लक्षात घेता, बांधकाम क्षेत्रामध्ये येत्या काही दिवसात किमतींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सध्याचा काळ हा तुमचे पहिले घर घेण्यासाठी तसेच गुंतवणूकदारांसाठी योग्य सुवर्णसंधी आहे, जेणेकरून भविष्यात यातून उत्तम परतावा मिळू शकतो.

सुभाष साकोरे
राम फुगे
डायरेक्टर
मंगलम लॅन्डमार्क्स

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top