ATM Card
ATM CardSakal

बँकेचा अजब कारभार! आईऐवजी मुलाचेच एटीएम कार्ड केले ब्लॉक

एटीएममध्ये अडकलेले आईचे कार्ड ब्लॉक करण्याऐवजी मुलाचे कार्ड ब्लॉक केल्याने आयसीआयसीआय बँकेतील संयुक्त बचत खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.
Summary

एटीएममध्ये अडकलेले आईचे कार्ड ब्लॉक करण्याऐवजी मुलाचे कार्ड ब्लॉक केल्याने आयसीआयसीआय बँकेतील संयुक्त बचत खातेधारकांना दिलासा मिळाला आहे.

पुणे - एटीएममध्ये (ATM Card) अडकलेले आईचे कार्ड ब्लॉक (Block) करण्याऐवजी मुलाचे कार्ड ब्लॉक केल्याने आयसीआयसीआय बँकेतील (ICICI Bank) संयुक्त बचत खातेधारकांना दिलासा मिळाला आहे. खातेधारकांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रास आणि तक्रार खर्चापोटी पंधरा हजार रुपये भरपाई (Compensation) देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने बँकेच्या कोथरूड शाखा व्यवस्थापकाला दिले आहेत.

पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर आणि सदस्या संगीता देशमुख, क्षितीजा कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. या प्रकरणी नितीन वेलदे आणि नीला वेलदे यांनी आयसीआयसीआय बँकेच्या कोथरूड शाखा व्यवस्थापकाविरोधात ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांतर्फे अॅड. श्रीराम करंदीकर यांनी बाजू मांडली. नितीन वेलदे आणि त्यांची आई नीला वेलदे यांचे आयसीआयसीआय बँकेच्या कोथरूड शाखेत संयुक्त बचत खाते आहे.

ATM Card
मॅट्रीमोनियल साईटवरून २५५ तरूणींची कोट्यवधींची फसवणूक; दोघे अटकेत

नितीन वेलदे हे भारतीय हवाई दलात नोकरीस आहेत. नीला वेलदे यांनी सात जून २०१४ रोजी एका खासगी बँकेच्या भांडारकर रस्त्यावरील एटीएममधून पैसे काढण्यासाठी मशिनमध्ये कार्ड टाकले. मात्र, कार्ड मशिनमध्येच अडकले. त्यामुळे नितीन वेलदे यांनी बँकेला एटीएममध्ये अडकलेले नीला वेलदे यांचे कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले. परंतु, बँकेने नितीन वेलदे यांचे कार्ड ब्लॉक केले. या प्रकारामुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागल्याने त्यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. तक्रारदारांच्या सांगण्यानुसारच एटीएम कार्ड ब्लॉक केले आहे. एटीएममध्ये कार्ड अडकल्याचा कोणताही पुरावा तक्रारदारांनी दाखल केला नाही. तसेच तक्रारदारांना दहाच दिवसांत नवीन एटीएम कार्ड दिले आहे, असा युक्तिवाद बँकेने केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com