पिंपरी लस न घेतलेले ८२ टक्के पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients
पिंपरी लस न घेतलेले ८२ टक्के पॉझिटिव्ह

पिंपरी लस न घेतलेले ८२ टक्के पॉझिटिव्ह

पिंपरी - कोरोना संसर्ग (Corona Infection) सध्या झपाट्याने वाढत (Increase) आहे. त्यात रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस (Vaccine) न घेतलेल्यांचे प्रमाण सुमारे ८२ टक्के आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी दिली. कोरोनावर मात करण्यासाठी लस घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आयुक्त पाटील यांनी शुक्रवारी (ता. ७) शहरातील नागरिकांशी फेसबुकद्वारे संवाद साधला. त्यात कोरोना, ओमीक्रॉन आणि लसीकरणाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या विरोधात लढाई चालू आहे. १५ दिवसांपूर्वी लढाई जिंकल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. पण, आता कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. ओमीक्रॉनची संसर्ग क्षमता डेल्टाच्या तुलनेत ३० वेळा अधिक आहे. त्यामुळे संसर्ग झपाट्याने होण्याची शक्यता आहे. त्याला रोखण्यासाठी आपल्या दिनचर्येत बदल करणे गरजेचे आहे. व्याधी असेल वा लस घेतली नसल्यास या रुग्णांची प्रकृती खालावण्याची शक्यता आहे. लस घेण्यास चालढकल करणे धोकादायक ठरू शकते. या लाटेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लस घेणे गरजेचे आहे. ’’

आयुक्त राजेश पाटील यांचे आवाहन

- सर्वांनी मास्क वापरावा, गर्दीची ठिकाणी टाळावेत, सॅनिटायझर वापरावे किंवा वारंवार हात धुवावेत

- सभा, समारंभ मोजक्या लोकांमध्येच करावेत; कार्यक्रमांसाठी उपस्थितीच्या संख्येचे पालन करावे

- आतापर्यंत लस घेतलेली नसल्यास पुढील दहा दिवसांत लसीकरण करून घ्यावे

हेही वाचा: पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवेदनांचा पाऊस

लसीकरणाचे वर्गीकरण

  • पहिला डोस घेतलेले - ९५ टक्के

  • दुसरा डोस घेतलेले - ७५ टक्क्यांपेक्षा अधिक

  • एकही डोस न घेतलेले - अंदाजे १ लाख ५० हजार

  • दुसरा डोस न घेतलेले - सुमारे दोन लाख

दृष्टिक्षेपात लसीकरण

  • कोव्हिशिल्ड घेतलेले - २७,६६,६८४

  • कोव्हॅक्सिन घेतलेले - २,४६,००६

  • स्फूटनिक व्ही घेतलेले - २८,१३२

  • आतापर्यंत दिलेले डोस - ३०,४०,८२२

विद्यार्थ्यांचा लसीकरणाला प्रतिसाद

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने १६ जानेवारी २०२१ पासून शहरात लसीकरण सुरू केले आहे. महापालिकेच्या केंद्रांवर कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. खासगी केंद्रांवर या दोन्ही लशींसह स्फूटनिक व्ही लससुद्धा दिली जात आहे. महापालिकेच्या व खासगी केंद्रांवर शुक्रवारपर्यंत (ता. ७ जानेवारी २०२२) ३० लाख ४० हजार ८२२ डोस दिले आहेत. त्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींना आठ लाख ८७ हजार २४६ आणि १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींना १९ लाख ८९ हजार ६० डोसचा समावेश आहे. आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्करला दिलेल्या डोसची संख्या एक लाख ५२ हजार २७६ आहे. चार जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. शुक्रवारपर्यंत अर्थात अवघ्या चार दिवसांत १२ हजार ४० मुलांनी लस घेतली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top