शहरात नव्याने विस्तारलेल्या परिसराला आले डिमांड

शहरात नव्याने विस्तारलेल्या परिसराला आले डिमांड

भाग : ३

पिंपरी, ता. ८ : हक्काचे घर असावे ते लहान असो की, शहरापासून काही अंतरावर..तरीही, चालेल. परंतु, ते स्वत:चे असावे. यासाठी शहरातील निम्नस्तरीय आणि मध्यमवर्गीय नागरिक सध्या २५ लाखांच्या आतील घरांसाठी ताथवडे, किवळे, पुनावळे, रावेत, मोशी, चिखली, बोऱ्हाडेवाडी, डुडुळगाव, मामुर्डी या भागाकडे सर्वाधिक वळले आहेत. बांधकाम वाढीचा वेग या भागात मोठ्या प्रमाणात आहे. शहरापासून विस्तारलेल्या महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांमध्ये आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे चित्र ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ व ‘सीआरई मॅट्रिक्स’ च्या अहवालातून दिसून आले आहे.

ताथवडे
ताथवडे भागात सर्वाधिक दोन्ही प्रकारच्या म्हणजेच २५ ते ५० लाख व ५० ते ७५ लाखांमधल्या दोन्ही प्रकारच्या घरांना नागरिक पसंती देत आहेत. २०१७ पासून ते २०२१ पर्यंत या भागात असाच ट्रेंड राहिला आहे. या भागात मात्र, सर्वाधिक घरांची वाढ वेगाने होत आहे. २०१७ मध्ये केवळ ३०९ करोड रुपयांची गुंतवणूक झालेल्या भागात २०२० मध्ये ९०० करोड रुपयांची गुंतवणूक जवळपास तीन पटीने झाल्याचे पहावयास मिळत आहे. तर, २०२१ मध्ये ७७५ इतक्या करोड रुपयांच्या १६३१ एवढ्या घरांची विक्री कोरोना काळातही झालेली आहे.

पुनावळे
हा भाग सर्वाधिक वेगाने विस्तारलेला असून २०२१ या कालावधीत १००३ करोड रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या भागात २५ लाखांपर्यंतच्या घरांना सर्वाधिक मागणी आहे. तसेच, घरांच्या विक्रीचा आलेख वाढतच गेला आहे. २०१९ मध्ये या भागात ६९५ कोटी रुपयांच्या १ हजार ६८२ इतक्या घरांची विक्री झाली आहे. तर, २०२० मध्ये १ हजार ७५७ घरांची विक्री ७८८ कोटी रुपयांना झाली असून २०२१ मध्ये २१६४ घरांची विक्री १,००३ कोटी झालेली आहे. या भागात आत्तापर्यंत घरांच्या मागणीचा आलेख घसरलेला नाही.

किवळे
कोरोना काळात व लॉकडाउनच्या खडतर कालावधीत या भागात सर्वाधिक २०२० मध्ये १,२३७ इतक्या ४७६ कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली आहे. तसेच, ११२२ घरांची विक्री झाली असून ती ४४३ कोटींपर्यंत गेली आहे. या भागात २०१७ ला घरांना सर्वाधिक मागणी कमी होती. सुरुवातीला २२६ कोटीच्या ६४१ इतक्या घरांची विक्री झाली आहे. ज्या भागाला सुरुवातीला मागणी कमी होती, त्या भागात कालातंराने मागणी प्रचंड वाढली आहे. या भागात स्वस्तातील घरांना म्हणजेच २५ लाखाच्या आतील घरांना सर्वाधिक मागणी आहे.

---
रावेतमध्ये सर्वाधिक घर खरेदीकडे वाढलेला कल :

(प्रति युनिट) (कोटींमध्ये)
वर्ष घरांची मागणी उलाढाल
२०१७ १,४४६ ६२६
२०१८ १, ६५३ ७२३
२०१९ १. ५७९ ६७८
२०२० १,८१३ ७९०
२०२१ १,५१२ ६८५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com