महापालिकेची सज्जता

महापालिकेची सज्जता

ओमीक्रॉनविरोधात
महापालिका सज्ज!

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिका ‘अलर्ट’

पिंपरी, ता.८ ः ‘ओमीक्रॉन’ या विषाणूमुळे येऊ घातलेली तिसरी लाट थोपविण्यासाठी महापालिकेने सहा रुग्णालये सज्ज केली आहेत. महापालिका प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेने सर्वतोपरी सुरक्षा आणि सज्जता घेण्यास सुरवात केली आहे. तसेच गरजेनुसार कोविड केअर सेंटर्स सुरु करण्याबाबत कार्यवाही सुरु केलेली आहे. त्यानुसार घरकुल, चिखली येथील बी-१० बिल्डिंगमध्ये दोन कोविड केअर सेंटर सुरु केले आहेत. टप्प्याटप्प्याने इतर कोविड केअर सेंटर कार्यान्‍वित करण्यात येतील.
शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोज २५० ते ५०० नवीन रुग्णांची भर पडत आहे. सध्या येथे गंभीर स्थिती नसली तरी कोरोनाची तिसरी लाट शहरात येऊच नये म्हणून महापालिका प्रशासन तयारीत आहे. कोरोना प्रसारावर नियंत्रण मिळवता येत नसल्यामुळे पालिका अलर्ट मोडवर आहे. यापूर्वी १५ ते ३० कोरोना केअर सेंटर सुरू होते. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर ते टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले होते. महापालिका प्रशासनाचा आदेश आल्यानंतर आवश्यकतेनुसार सुरू केले जाणार आहे.

आठ तपासणी सेंटर
नागरिकांनी कोविडची लक्षणे आढळल्यास त्वरित टेस्टिंग करून घ्यावे. महापालिकेच्या आठ झोनल रुग्णालयामध्ये (भोसरी रुग्णालय, सांगवी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, थेरगाव रुग्णालय, आकुर्डी रुग्णालय, तालेरा रुग्णालय व यमुनानगर रुग्णालय) टेस्टिंगची सोय मोफत केली आहे.

जम्बोसाठी महापालिकेची मान्यता
जम्बो कोविड सेंटर व ऑटोक्लस्टर सेंटरमध्ये रुग्णांची थेट भरती करण्यात येणार नसून त्यासाठी महापालिकेच्या सर्व रुग्णालयामधून संदर्भित केलेली चिठ्ठी (Refer Chit) घेणे आवश्यक आहे. ऑटोक्लस्टर सेंटर महापालिका खुद्द चालविणार आहे. तर जम्बोसाठी महापालिकेची मान्यता घेतली आहे. कोविड रुग्णालयात आवश्यक औषधसाठा, व्हेंटिलेंटर, ऑक्सिजन व इतर वैद्यकीय सुविधा तसेच रुग्णवाहिका सज्ज आहे. ६०० ऑक्सिजन बेड, २०० आयसीयू बेड आहेत. गरजेनुसारचा वायसीएम रूग्णालयाचा वापर करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयातील आयुसीयुमधील गंभीर रुग्ण थेट महापालिकेच्या आयसीयुमध्ये दाखल करून घेतले जाणार नाहीत. महापालिका हद्दीमधील रुग्णांना प्राधान्याने रूग्णालयात भरती केले जाईल.

कोट
‘‘कोविडच्या लाटेला थोपविण्यासाठी महापालिका स्तरावर समन्वयक अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जे रुग्ण भरती होत आहेत. त्यामध्ये लसीकरण न घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे. नागरीकांनी मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे, सॅनिटायसरचा वापर करावा. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.’’
-डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

कोरोनाचा आलेख वाढतोय
तारीख - बाधित संख्या
४ जानेवारी - ३५०
५जानेवारी- ५९०
६जानेवारी - ८१७
७ जानेवारी -१०००

३४०१८, १९, २०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com