स्वामी विवेकानंद क्रांतिकारी संन्यासी - गुरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी विवेकानंद क्रांतिकारी संन्यासी - गुरव
स्वामी विवेकानंद क्रांतिकारी संन्यासी - गुरव

स्वामी विवेकानंद क्रांतिकारी संन्यासी - गुरव

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ ः ‘‘पराक्रम, सेवा, त्याग या गुणांनी युक्त असलेले युवकच भारतमातेचे उत्थान करू शकतील, या विश्वासाने स्वामी विवेकानंद यांनी युवकांची चळवळ उभारली. शारीरिक बलसंवर्धन हे अध्यात्माइतकेच महत्त्वाचे आहे, असे ते मानत होते. ते क्रांतिकारी संन्यासी होते,’’ असे प्रतिपादन अवधूत गुरव यांनी केले.
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे चिखलीतील शरदनगरमध्ये आयोजित ‘युवकांसाठी विवेकानंद’ विषयावरील व्याख्यानात गुरव बोलत होते. डॉ. विजय भळगट, उद्योजक महादेव कवितके, पंढरीनाथ मस्के, काका मेदनकर, राजेंद्र घावटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे, महेश मांडवकर आदी उपस्थित होते. यावेळी गुरव म्हणाले, ‘‘अफाट बुद्धिमत्तेमुळे बिलेश्वर ऊर्फ नरेंद्र याला शाळेतून काढून साहित्य, संगीत, कला अशा विविध विषयांच्या शिकवण्या लावण्यात आल्या. त्यामुळे बालवयातच त्याचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू झाले. रामकृष्ण परमहंस यांची भेट होईपर्यंत नरेंद्र हा पूर्णपणे नास्तिक होता. सामान्य जनता शिवस्वरूप मानून तू त्यांची सेवा कर, हा परमहंस यांचा आदेश मानून नरेंद्रने अखंड दहा वर्षे भारतभ्रमण केले. या भ्रमंतीमधून नरेंद्रचे रूपांतर ‘स्वामी विवेकानंद’ या व्यक्तिमत्त्वात झाले.’’

आरोग्य शिबिर
प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली. ५१ जणांनी रक्तदान केले. ११० जणांनी रक्तगट व मधूमेह तपासणी केली. पंधरा ते अठरा वयोगटातील ७२ मुलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. सुनील पंडित, सुनील खंडाळकर, शंकरराव बनकर, अशोक हाडके, सिद्राम मालगट्टी, हंबीरराव भिसे, वैजनाथ गुळवे यांनी संयोजन केले. राजेश चिट्टे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद वेल्हाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संतोष ठाकूर यांनी आभार मानले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top