
आजी-माजी सरपंचांचा सत्कार गावोगावी होणार
सोमाटणे, ता. ३१ ः सोमाटणे येथील मुऱ्हे परिवाराच्या वतीने पवन मावळातील सर्व गावांतील आजी-माजी सरपंचांचा सत्काराचा उपक्रम आजपासून सुरू करण्यात आला आहे. ग्रामपंचायत स्थापनेनंतर माजी सरपंचांनी गाव विकासासाठी मोठे योगदान दिले परंतु बदलत्या काळाच्या ओघात ते दुर्लक्षित झाले. अनेक जण वृद्धावस्थेमुळे गाव कारभारापासून दूर झाले. यापूर्वी त्यांनी केलेल्या व सध्या करीत असलेल्या त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, त्यांनाही आपण केलेल्या आपल्या विकासकामांचे समाधान व्हावे या उद्देशाने सोमाटणे येथील मुऱ्हे परिवारातील ग्रामपंचायत सदस्य नितीन मुऱ्हे, उपसरपंच सचिन मुऱ्हे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुऱ्हे, राकेश घारे यांच्या वतीने आजी-माजी सरपंच सत्काराचा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात आज उर्से ग्रामपंचायतीपासून आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते मानपत्र, भेटवस्तू, श्रीफळ देऊन करण्यात आली. या बाबत संतोष मुऱ्हे म्हणाले, ‘‘हा उपक्रम पवन मावळातील सर्व गावात राबवला जाणार असून, कोरोनाचे नियम पाळण्यासाठी आजी माजी सरपंच यांच्या घरी जाऊन पाच जणांच्या उपस्थितीतच हा
घरगुती सत्काराचा उपक्रम केला जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..