
बोर्डाची ऑफलाइन परीक्षा कॅन्सल करा,
बोर्डाची ऑफलाइन परीक्षा रद्द करा
निगडीत दहावी-बारावीच्या मुलांचे आंदोलन
पिंपरी,ता.३१ ः दहावी परीक्षा रद्द करा, ऑफलाइन परीक्षा कॅन्सल करा, अशा घोषणा देत शहरातील शेकडो विद्यार्थी आज (ता. ३१) रस्त्यावर उतरले. शेकडो मुलांनी निगडी ते आकुर्डी बजाज कंपनी दरम्यान घोषणा फेरी काढली. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत परीक्षा ऑनलाइन घ्या किंवा परीक्षाच रद्द करा, अशी मागणी केली.
निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून दुपारी बाराला आंदोलनास सुरवात केली. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा आणि महाविद्यालय हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. या वर्षीही ऑनलाइन वर्ग घेण्यात आले. काही दिवसांपूर्वीच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. इयत्ता १२ वीच्या परीक्षा ४ मार्चपासून तर दहावीच्या परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार असल्याचे सांगितले. हे सांगतानाच या दोन्ही वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार, असेही शिक्षण मंत्र्यांनी सांगितले होते. शिक्षणमंत्र्यांच्या याच निर्णयाच्या विरोधात विद्यार्थी आज (ता. ३१) रस्त्यावर उतरले आहेत. ‘‘आमचे सगळे वर्ग ऑनलाइन झाले आहेत. आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही आणि झाला तेवढा समजला नाही. त्यामुळे आम्ही परीक्षेला कसे सामोरे जायचे,’’ असा प्रश्न उपस्थित करत बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. यात आकुर्डीतील म्हाळसाकांत विद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, घरकुल परिसरासह शहरातील विविध भागातील शाळा -कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी - बारावीच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परीक्षा रद्द करा, अशा घोषणा देत निगडी परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले. शेकडो मुलांनी निगडी ते बजाज कंपनी दरम्यान घोषणा फेरी काढली.
फोटो ः 39520, 39522
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..