इराणी टोळी देहबोलीवरून हेरतात सावज 

लाखों रुपयांचे सोन्याचे दागिने करतात सहजरित्या लंपास

इराणी टोळी देहबोलीवरून हेरतात सावज लाखों रुपयांचे सोन्याचे दागिने करतात सहजरित्या लंपास

पिंपरी, ता. १४ : अंगावर दागिने असलेले पन्नाशी पेक्षा अधिक वय असलेली व्यक्ती ‘टार्गेट’ ठेवायची. त्या व्यक्तीची नजर व देहबोलीवरून सावज हेरून ते टप्प्यात येणार हे निश्चित होते. अन् काही क्षणात लाखों रुपयांचे सोन्याचे दागिने इराणी टोळी सहजरित्या लंपास करते.

पोलिस असल्याची बतावणी करण्यासह सोनसाखळी चोरीची घटना घडली की, पोलिसांचा पहिला संशय इराणी टोळीवर येतो. चोऱ्या, लूटमार यामध्ये तरबेज असलेल्या इराणी टोळीने धुमाकूळ घातला आहे. या टोळ्यांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुण्यातील पाटील इस्टेट, लोणी काळभोर यासह कल्याणमधील आंबिवली या भागात या टोळ्या मोठ्या प्रमाणत आहेत. कमी वयातील मुले सुरुवातीला सोनसाखळी चोरी करतात, मोठे झाल्यावर बतावणी करून दागिने लुटण्याकडे वळतात. या टोळीची दागिने लुटायची पद्धत नेहमीची असते. राहत असलेल्या ठिकाणापासून चोरलेल्या दुचाकीने दूर अंतरावर जाऊन लूटमार करायची. यासाठी निर्जनस्थळ शोधून तेथे दागिने परिधान केलेला व्यक्तीला ‘टार्गेट’ करतात. समोरासमोर आल्यानंतर समोरच्या व्यक्तीची नजर व देहबोली यावरूनच ती व्यक्ती आपल्या जाळ्यात अडकणार की, नाही याचा या भामट्याना अंदाज येतो. त्यामुळे काही क्षणातच पुढचा प्लॅन तयार ठेवतात. टोळीतील पहिला चोरटा आपण पोलिस असल्याचे सांगत समोरच्या व्यक्तीकडील दागिने काढून स्वतःकडील एका कापडात घेतो. ते दागिने पिशवीत ठेवणायचा बहाणा करीत असतानाच दुसरा चोरटा तेथे येतो. तो दागिने दिलेल्या व्यक्तीला एखादा पत्ता अथवा इतर माहिती विचारून गोंधळून सोडतो. त्याचवेळी ते दागिने पहिला चोरटा हातचलाखीने स्वतःकडे काढून घेतो. रिकामे कापड पिशवीत टाकतो. व नंतर आजूबाजूला असणारे इतर दोघेजण असे सर्व मिळून पसार होतात.
मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांच्या हाती लागण्याची भीती असल्याने हे भामटे चोरीच्या दिवशी मोबाईल घरीच ठेवतात, अथवा बंद ठेवतात. अवघ्या पाच ते दहा मिनिटात ऐवज लुटून टोळी पसार होते. गुन्हा करून जाताना मुख्य रस्त्याने न जाता अंर्तगत रस्त्याने जातात. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद होत नाहीत. यामुळे ते सहीसलामत सुटतात.
-------------

बोलण्यात गुंतला की टार्गेट फिक्स

जो व्यक्ती त्यांच्या बोलण्यात गुंतला कि, ''टार्गेट'' झालाच. एखाद्या व्यक्तीने प्रतिप्रश्न केल्यास अथवा इतर माहिती विचारल्यास हे टोळके कसलीही जबरदस्ती करीत नाहीत. एखाद्यावेळी समोरच्या व्यक्तीकडून प्रतिकार झाला तरी दुसरा चोरटा तेथे येतो व सर्वांना बोलण्यात गुंतवून वेळ मारून नेतो.
---------------

असे दिसतात

रंग गोरा, नाक सरळ, त्वचा लालसर, डोळ्यालगतचा भाग जाडसर अशी यांची शरीरयष्टी असते. तसेच भाषा हिंदी, मराठी बोलतात.
----------------

यावरून पडले इराणी नाव
हे लोक इराणी पद्धतीची भाषा बोलतात. काहींचे आडनावही इराणी आहे. तसेच अनेक वर्षांपूर्वी हे लोक इराण मधून आल्याचेही बोलले जाते. त्यामुळे यांना इराणी म्हटले जाते.
---------------


- ही काळजी घ्या

कोणावरीही लगेच विश्वास ठेवू नये
ओळखपत्र विचारावे
दागिन्यांचे प्रदर्शन नको
निर्जनस्थळी एकटे फिरू नये
तातडीच्या मदतीचे संपर्क क्रमांक सोबत ठेवा


---------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com