
पुन्हा शाळा भरली; पण उपस्थिती कमी
पिंपरी, ता.१ ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, आता रुग्णसंख्या कमी झाल्याने आजपासून (ता. १) पुन्हा ६५८ शाळा सुरू झाल्या. कोरोनाचे सर्व नियम पाळून शहरातील पहिली ते बारावीचे वर्ग भरले देखील. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीने शाळा परिसर विद्यार्थ्यांनी फुलून गेला. पण पहिल्या दिवसाची उपस्थिती पाहता पालकांमध्ये मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, असा संभ्रम कायम असल्याचे दिसून आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे गेल्या तीन-चार वेळेपासून आठ-दहा दिवस शाळा सुरू आणि बंद असा प्रकार सुरू आहे. आधीच पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले आणि प्रादुर्भावही कमी झाल्याने शाळा आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले होते. डिसेंबर महिन्यात शाळाही न पाहिलेले पहिली ते सातवीच्या वर्गात विद्यार्थी आले होते. परंतु अवघे पंधराच दिवस शाळेत आल्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुन्हा शाळा बंद ठेवण्यात आल्या. १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद राहतील, असा निर्णय घेतला होता. शाळा बंदला होणारा विरोध लक्षात घेता आजपासून शाळा सुरू केल्या. सकाळच्या सत्रात चार तासांचीच शाळा भरली. अनेक शाळांनी पालकांकडून शाळेत पाठविण्याबाबतचे संमतिपत्र घेतले. पण परिसरातील कोरोना आणि त्याची केवळ रुग्ण संख्या घटली आहे. मात्र, धोका कायम असल्याने अनेकांना पाल्याची चिंता वाटत असल्याने पूर्व प्राथमिक शाळामध्ये प्रतिसाद कमी मिळाला.
गेंदीबाई ताराचंद हायस्कूलमध्ये स्वागत
श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीने शालेय परिसर विद्यार्थ्यांनी फुलून गेला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विद्यालयाचे प्राचार्य विक्रम काळे , पर्यवेक्षक शशिकांत हुले ,शिक्षक प्रतिनिधी प्रीती गिल यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन झाले. तसेच सर्व मान्यवरांनी व शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांना फुलांची उधळण करून , गुलाब पुष्प देऊन ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगीशाळेच्या पहिल्या दिवशी आकर्षक सरस्वती पूजन , रांगोळी ,अप्रतिम फलक लेखनही करण्यात आले होते. मुलांनी आपल्या मनोगतात शाळा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यानिमित्ताने संस्थेचे राजेंद्रकुमार मुथा, अनिलकुमार कांकरिया, प्रकाशचंद चोपडा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांचे टेंपरेचर व ऑक्सिमीटरच्या माध्यमातून नोंदी घेण्यात आल्या.
‘नवमहाराष्ट्र’मध्ये ऑनलाइन व ऑनलाइन
पिंपरी वाघेरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालयात कोरोनाचे सर्व नियम पाळत शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच मुलांच्या शरीराचे तापमान व हातांना सॅनिटायझर लावूनच शिक्षक त्यांना वर्गात सोडत होते. वर्गात विद्यार्थी मास्क घालून बसले. शिक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांना वर्गात ऑनलाइन व ऑनलाइन शिकविताना दिसून आल्या. सर्व विद्यार्थी आनंदात असल्याचे पाहून सर्व शिक्षकवृंदांना देखील आनंद झाला. कार्यक्रमाचे संयोजन शाळेतील शिक्षकांनी केले.
39663
39664
39666
39667
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..