RTO-Pimpri-Chinchwad
RTO-Pimpri-ChinchwadSakal

आरटीओकडून जप्त केलेल्या वाहनांचा पिंपरी चिंचवडमध्ये 'ई-लिलाव'

मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर ‘ई-लिलाव’ मंगळवारी (ता. १६) करण्यात येणार आहे.
Summary

मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर ‘ई-लिलाव’ मंगळवारी (ता. १६) करण्यात येणार आहे.

पिंपरी - मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा (Seized Vehicle) जाहीर ‘ई-लिलाव’ (E-Auction) मंगळवारी (ता. १६) करण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे (Atul Aade) यांनी कळविली आहे.

आरटीओच्या ‘वायुवेग’ या तपासणी पथकांकडून वेळोवेळी वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात येते. यामध्ये वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई होते. यातील काही वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, जे वाहनचालक दंड भरत नाहीत, अशी वाहने जप्त केली जातात. त्यांच्यावर खटला भरला जातो. त्यानंतर ही वाहने लिलावात काढण्यात येतात. सध्या आरटीओ कार्यालयाच्या परिसरात जप्त केलेली पुष्कळ वाहने उभी आहेत. या वाहनांमुळे दैनंदिन कामासाठी आरटीओमध्ये येणाऱ्या नागरिकांना वाहन लावण्यासाठी जागाच राहिलेली नाही. बऱ्याच दिवसांपासून उभ्या असलेल्या वाहनांमुळे कार्यालयाच्या परिसरामध्ये अस्वच्छता वाढली आहे. वाहन मालकांना लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आरटीओने वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

RTO-Pimpri-Chinchwad
पिंपरी : महापालिका कर्मचारी महासंघाची निवडणूक जाहीर

लिलाव करण्यात येणारी वाहने वाघेश्‍वर पार्किंग येथील आवारात पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. ई-लिलावात ३४ वाहने उपलब्ध आहेत. यात टुरिस्ट टॅक्सी, ट्रक, बस, हलकी परिवहन वाहने, रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. या लिलावात सहभागी होण्यासाठी ११ ते १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकेतस्थळावर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात ५० हजार रुपये रकमेचा प्रादेशिक परिवहन विभाग पुणे या नावाने अनामत धनादेशासह नावनोंदणी करून प्रत्यक्ष येऊन पूर्तता करावी. या लिलावात जीएसटी धारकांनाच सहभाग होता येणार आहे. सविस्तर माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आदे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com