
गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त
हिंजवडीत दुचाकीस्वार अपघातात मृत्युमुखी
पिंपरी, ता. १३ : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना हिंजवडी येथे घडली. प्रमोद नंदू चव्हाण (वय २३) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुनील अरुण हिरे (रा. बालाजीनगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूरज संपत शेंडगे (वय ३२, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (ता. १२) हिंजवडीतील फेज तीन येथील टीएसजी सोसायटीसमोरील रस्त्याने छोट्या टेम्पोतून भरधाव आलेल्या आरोपीने प्रमोद यांच्या दुचाकीस जोरात धडक दिली.
पिंपळे गुरवमध्ये घरफोडीत दीड लाखांचा ऐवज लंपास
पिंपरी, ता. १३ : दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने दीड लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली.
याप्रकरणी अशोक गणपत उत्तेकर (रा. साईतेज अपार्टमेंट, शिवरामनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना दरवाजाचे कुलूप तोडून चोरटा आत शिरला. दोन सोनसाखळीसह कानातील सोन्याचे दागिने, एक घड्याळ व सात हजारांची रोकड असा एकूण एक लाख ४४ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पिंपरीत महिलेचे दागिने हिसकावले
पिंपरी, ता. १३ : दुचाकीवर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील ५२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. ही घटना पिंपरी येथे घडली. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या अजमेरा कॉलनीतील योगी को. ऑपरेटिव्ह सोसायटीसमोरील रस्त्यावर दुचाकीवर त्यांच्या दोन मुलांसह थांबल्या होत्या. त्यावेळी दुसऱ्या दुचाकीवरून आलेले दोन चोरटे फिर्यादी यांच्या गळ्यातील ५२ हजार रुपये किमतीच्या दोन सोनसाखळी हिसकावून पसार झाले. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पिंपळे निलखमध्ये गुटखा विक्रीप्रकरणी एकाला अटक
पिंपरी, ता. १३ : बेकायदारित्या गुटखा विक्री केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई पिंपळे निलख येथे करण्यात आली. आकाश शिवराज काजगर (वय २६, रा. गणेशनगर, पिंपळे निलख) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी बेकायदारित्या पान टपरीत गुटख्याचा साठा व विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून आठ हजार ४३३ रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
चिखलीत पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावला
पिंपरी, ता. १३ : रस्त्याने पायी जाणाऱ्या एकाचा मोबाईल हिसकावला. ही घटना चिखली येथे घडली. याप्रकरणी हेमंत मुगुटराव चव्हाण (रा. राजे शिवाजीनगर, प्राधिकरण, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे चिखलीतील स्पाईन रोडवरील जाधव सरकार चौक येथून पायी जात असताना दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यातील मागे बसलेल्या चोरट्याने फिर्यादीच्या हातातून पाच हजारांचा मोबाईल हिसकावला. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..