
धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
तळेगावात सोसायट्यांमध्ये
कचऱ्याबाबत जनजागृती
तळेगाव दाभाडे (स्टेशन) ता. १५ ः तळेगावात सध्या स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. ध्वनीक्षेपनाद्वारे मोठ्या प्रमाणात चौकाचौकात विविध सोसायट्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला कचरा नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी कचरा उचलून टँक्टर ट्रॉलीत भरून मोरखळा येथील कचराडेपोत आणून टाकतात. रोज कचरा टाकल्याने मोठ्या प्रमाणात कचऱ्यांचे ढीग साचतात जास्त प्रमाणात कचरा साठत असल्याने त्याला नष्ट करण्यासाठी तो जाळण्यात येत आहे. धुराच्या प्रदूषणाने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ओला-सुखा कचरा जळत असल्याने दुर्गंधी सुटत आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना स्वसनाचे विकार जडत आहे. यामुळे एकीकडे गावपरिसरात स्वच्छता अभियान तर दुसरीकडे कचराडेपो परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नगरपरिषदेने कचरा डेपोतील कचरा न जाळता योग्य ती उपाययोजना करावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
tas-15-2-22-P2-
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..