
एमएसएमई उद्योजकांना माफक दराने वीज
पिंपरी, ता. १५ : एमएसएमई उद्योजकांना वर्षभरात सभासद करून वीज कंपनी स्थापन करून माफक दराने वीज पुरविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महागडी वीज खंडित करून अखीत सोलर व हवा निर्मात्यांकडून वीज घेतली जाणार असल्याचे पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स ॲण्ड सर्व्हिसेसच्या बैठकीत सांगण्यात आले.
पिंपरी-चिंचवड चेंबरच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त एमआयडीसी, चिंचवड या ठिकाणी पार पडला. उद्योजकांवरील जकात व नंतर एलबीटी रद्दसाठी आंदोलनात अग्रेसरपणे केलेल्या कार्यामुळे उद्योगांवरील संकट टळले. माथाडी कायद्यासाठी शासकीय अंमलबजावणी व संनियत्रण समिती स्थापन केली. जीएसटी कायद्यातील मसुद्यात सहकारी यंत्रणांना उद्योग, व्यापारी कारखान्यांना विना नोटीस झडतीचा अधिकार व बॅंकखाती गोठविणारे अधिकार रद्द करण्यात आले. एमएसएमइ उद्योगांना मोठ्या कंपन्यांकडून बिलाचे पैसे ४५ दिवसांत देण्यास भाग पाडले. वॅट समितीवर सल्लागार म्हणून चेंबरची नियुक्ती केल्याने अनेक समस्यांपासून उद्योजकांना हातभार लागला. तसेच माथाडी कायदा हा ३० किलोपर्यंतचे ओझे पाठीवरून वाहणाऱ्या हंगामी कामगारांसाठी लागू नाही. एमआयडीसी व महानगरपालिका हा स्वतंत्र करणारा कायदा महाराष्ट्रात करून स्वतंत्र टाऊनशिप व्हायला हवी, असे अध्यक्ष ॲड. अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.
संचालक विनोद बंसल यांनी जकात व एलबीटी रद्द विषयी तर, रामदास माने यांनी विविध कामांसाठी दिलेला शासन सेवा हमी कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे सांगितले. करसल्लागार संघटनेचे अध्यक्ष आर.डी. कुटे, पी.के महाजन, तसेच काकासो देशमुख यांनी विचार मांडले
यावेळी लिलाधर वराडे, राजश्री गागरे, अमन शरीफ, आशिष शाह, उमेश राऊळ, प्रवीण बोंबाटकर, राजेश प्रजापती, सुनील झा, संदेश पांडे, विकास होरा, आकाश वाघोले आदी उद्योजक उपस्थित होते. रंगना गोडगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रेमचंद मित्तल यांनी स्वागत केले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..