
महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा २१ फेब्रुवारी ते ७ मार्च
पिंपरी, ता. २० : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित ६० वी ‘महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२१-२२’ प्राथमिक फेरी चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात २१ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान होणार आहे. एकूण १४ दर्जेदार नाटकांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. सोमवारी २१ फेब्रुवारीला ‘दि अल्टिमेट फ्रेमवर्क’, मंगळवारी २२ फेब्रुवारीला ‘टुडे इज अ गिफ्ट’, बुधवारी २३ फेब्रुवारीला ‘@गावभाग’, गुरुवारी २४ फ्रेबुवारीला ‘फसवणूक पण गोड’, शुक्रवारी २५ फेब्रुवारीला ‘समा ए सरहद’, शनिवारी २६ फेब्रुवारीला ‘मोरुची मावशी’ हे नाटक सायंकाळी ७ वाजता होणार आहे. रविवारी २७ फेब्रुवारीला ‘एक डोह अनोळखी’ हे नाटक दुपारी १२.३० वाजता होणार आहे. तसेच, सोमवारी २८ फेब्रुवारीला ‘स्टेलमेंट...अनएंडिंग गेम’, मंगळवारी १ मार्चला ‘विषाद’, बुधवारी २ मार्चला ‘सावळबाधा’, गुरुवारी ३ मार्चला ‘आरंभी स्मरितो पाय तुझे’, शुक्रवारी ४ मार्चला कर्फ्यू, सोमवारी ७ मार्चला ‘पुरुषोत्तम’ ही नाटके सायंकाळी ७ वाजता होणार आहेत. तर, शनिवारी ५ मार्चला दुपारी १२.३० वाजता ‘ऋणानुबंधाच्या’ हे नाटक होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..