कर्मचारी महासंघाचा प्रचार शिगेला येत्या शुक्रवारी मतदान, दोन्ही पॅनेलकडून गाठीभेटी, कोपरासभावर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्मचारी महासंघाचा प्रचार शिगेला
येत्या शुक्रवारी मतदान, दोन्ही पॅनेलकडून गाठीभेटी, कोपरासभावर भर
कर्मचारी महासंघाचा प्रचार शिगेला येत्या शुक्रवारी मतदान, दोन्ही पॅनेलकडून गाठीभेटी, कोपरासभावर भर

कर्मचारी महासंघाचा प्रचार शिगेला येत्या शुक्रवारी मतदान, दोन्ही पॅनेलकडून गाठीभेटी, कोपरासभावर भर

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० ः सध्या शहरात पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी येत्या २५ फेब्रुवारीला मतदान होणार असल्याने प्रचार शिगेला पोचला आहे. उमेदवारांनी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी, कोपरा सभा अन् सोशल मिडीयावर भर दिला आहे. पराभवाचा वचपा काढण्यासाठी ‘स्व. शंकर गावडे कर्मचारी महासंघ’ पॅनेल रिंगणात उतरले आहेत तर गतविजेता आपला महासंघ पॅनेल वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परिणामी या चुरशीच्या लढाईकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
महापालिकेमध्ये कर्मचारी महासंघाचे ७ हजार सभासद आहेत. महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणीची सन २०२२ ते २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीसाठीची निवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीसाठी अर्जही दाखल झाले होते. परंतु, कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने निवडणूक पुढे ढकलली होती. सध्यस्थितीत रूग्णसंख्या घटल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. गेल्या निवडणुकीत अंबर चिंचवडे यांच्या ‘आपला महासंघ’ पॅनेलने दणदणीत विजय मिळवत महासंघामध्ये सत्तापरिवर्तन घडविले होते. तब्बल १५ वर्षे एकहाती वर्चस्व राखलेल्या बबन झिंजुर्डे यांच्या स्व. शंकर गावडे कर्मचारी महासंघ पॅनेलला पराभवाचा झटका सहन करावा लागला होता. त्यामुळे यावर्षी मोठ्या तयारीनिशी झिंजुर्डे मैदानात उतरले आहेत. दोन्ही पॅनेलचे उमेदवार कार्यकर्त्यांसह प्रचाराला लागले आहेत.

गेल्या ४ वर्षात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या चुका काढण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला गळ घालत आहेत. गेल्या मतदानामध्ये पात्र मतदारांपैकी तब्बल ८१.४३ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. या निवडणुकीत महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे विद्यमान पॅनेलकडून सांगण्यात येत आहे, तर जाहीरनाम्यात दिलेली वचने पूर्ण केलीत की नाही, यावर विरोधकांनी लक्ष्य केले आहे. प्रचाराचा मुद्दाच तो ठेवला आहे. गेल्या निवडणुकीतील काही विजयी सदस्यांबाबत ‘राजीनामानाट्य’ घडल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळविला आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याचे दिसत आहे.


२१ वर्षे बिनविरोध निवड
पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या २१ वर्षांपूर्वी झालेल्या स्थापनेपासून २०१९ पर्यंत बिनविरोध निवडणूक होत होती. कै. शंकर अण्णा गावडे यांच्यानंतर सध्याचे अध्यक्ष झिंजुर्डे हे महासंघाची धुरा सांभाळत होते. एकेकाळी झिंजुर्डे यांचेच विश्‍वासू सहकारी राहिलेल्या व महासंघाच्या खजिनदारपदाची तब्बल १२ वर्षे जबाबदारी पार पाडलेल्या चिंचवडे यांनी वेगळी चूल मांडली. महासंघाच्या निवडणुकीबाबत आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. तसेच निवडणूक घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत न्यायालयाच्या आदेशानुसार २०१९ पासून महासंघाच्या निवडणुकीला सुरवात झाली.

गतनिवडणुकीतील गाजलेले मुद्दे
गत निवडणुकीत कामगारभवनाची कथित चढ्या दराची निविदा, विमा योजनेऐवजी धन्वंतरी योजना आणि मेडिकलमध्ये झालेला कथित भ्रष्टाचार हे मुद्दे गाजले होते. ‘आपला महासंघा’च्या पॅनेलमधील सर्वच उमेदवारांनी या मुद्यांवरून निवडणुकीमध्ये रंगत आणली होती. पण या चार वर्षात शिक्षकांसाठीच्या ‘धन्वंतरी योजने’चा निकाल लागलेला नाही. न्यायप्रविष्ट बाब बनली आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये दोन गट पडले आहेत. चार शिक्षक संघटनांतील ९६७ शिक्षकांचे झुकते माप कोणाला मिळते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top