
देहूरोड मधील व्यापाऱ्यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी
देहूरोड, ता. २४ ः देहूरोडमधील व्यापाऱ्यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी येथील व्यापाऱ्यांनी देहूरोड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक वर्षाराणी पाटील यांच्याकडे गुरुवारी(ता. २४) बाजारपेठेतील वैश्य समाज मंदिरात झालेल्या बैठकीत केली.
पोलिस बंदोबस्त वाढवावा, सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, पोलिस गस्त वाढवावी, रात्रीच्यावेळी काही युवक बाजारपेठेत उशिरापर्यंत रस्त्यावर फिरतात, व्यापाऱ्यांनी बांधकामे सुरू केल्यावर अनेकजण हप्ता वसुलीसाठी येतात, या सर्व घटनांवर आळा बसवावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. पोलिस निरिक्षक वर्षाराणी पाटील यांनी सांगितले,‘‘सध्या पोलिस संख्या कमी आहे. सध्या केवळ साठ पोलिस कर्मचारी आहेत. अशाही परिस्थितीत पोलिस काम करतात. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार पोलिस गस्त वाढविण्यात येईल. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानावर लावलेले सीसीटिव्ही कॅमेरे व्यवस्थित लावावेत. कोणी गैरवापर करून पैसे मागत असेल, तर पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.’’ यावेळी ज्येष्ठ व्यापारी कांती पारेख, कँटोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य अॅड. कैलास पानसरे, माजी उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, मदन सोनिगरा, अॅड. कृष्णा दाभोळे, आशिष बंसल, वसंत मेहता, सुनील गायकवाड, सूर्यकांत सुर्वे, रेणू रेड्डी, मिकी कोचर व इतर व्यापारी उपस्थित होते.
फोटो ः PNE22S45642
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..