सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापालिकेतर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापालिकेतर्फे सत्कार
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापालिकेतर्फे सत्कार

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापालिकेतर्फे सत्कार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः महापालिका सेवेतून फेब्रुवारीअखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक केशव घोळवे, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप आदी उपस्थित होते. सहशहर अभियंता प्रवीण लडकत, मुख्याध्यापक संध्या गवळी, अनिता बगाटे, मंगल काळे, उपअभियंता स्थापत्य भाऊसाहेब साबळे, सहायक शिक्षक पंढरीनाथ जरांडे, क्रीडा शिक्षक देवेंद्र घोडके, गटनिर्देशक सुनील मोरे, उपशिक्षक माधुरी जाधव, छाया गायकवाड, वाहनचालक बसीर तांबोळी, रखवालदार अंकुश पवार, मजूर दीपक गागडे, सफाई सेवक कमलेश ककरोठी, गटरकुली प्रकाश कांबळे, कार्यालयीन अधीक्षक साहेबराव साळुंके, मुकादम रवींद्र गायकवाड, शिपाई अजित शितोळे, स्प्रे कुली लक्ष्मण राऊत, सफाई कामगार मिलिंद गायकवाड, सफाई सेवक गोपाल घारू, कचरा कुली सुरेश जगताप यांचा निवृत्त झालेल्यांमध्ये समावेश आहे. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.