Fri, March 24, 2023

पिंपरी-चिंचवडमध्ये ४१ नवीन रुग्ण
पिंपरी-चिंचवडमध्ये ४१ नवीन रुग्ण
Published on : 1 March 2022, 12:15 pm
पिंपरी, ता. १ ः कोरोना संसर्ग झालेले ४१ रुग्ण मंगळवारी (ता. १) शहरात आढळले. आतापर्यंत तीन लाख ५८ हजार ७५१ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. आज ९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत तीन लाख ५४ हजार ४५४ जण बरे झाले असून, चार हजार ६२० जणांचा मृत्यू झाला. सध्या ४७ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ३६१ जण गृहविलगीकरणात आहेत. एकूण ४०८ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत ३४ लाख २४ हजार ७४६ जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. आज २७३ घरांतील ७८९ नागरिकांची तपासणी केली. सध्या २६ मेजर व ८३३ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.