चऱ्होलीत आज बैलगाडा शर्यंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चऱ्होलीत आज बैलगाडा शर्यंत
चऱ्होलीत आज बैलगाडा शर्यंत

चऱ्होलीत आज बैलगाडा शर्यंत

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः चऱ्होलीचे ग्रामदैवत वाघेश्‍वर महाराज उत्सव महाशिवरात्री अर्थात मंगळवारपासून (ता. १) सुरू झाला. बुधवारी (ता. २) बैलगाडा शर्यत आणि गुरुवारी (ता. ३) कुस्त्यांचा फड रंगणार आहे. कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने शहर परिसरातील यात्रा उत्सवांना सुरुवात झाली आहे.

महाशिवरात्रीनिमित्त वाघेश्‍वर महाराज मंदिराला पुष्पहारांनी सजविले आहे. विद्युत दिव्यांची रोषणाई केली आहे. मंगळवारी सकाळी रुद्राभिषेक करण्यात आला. मंदिराच्या पायथ्याला असलेला बैलगाडा शर्यतीच्या घाटाची साफसफाई केली आहे. शेजारील मैदानावर मातीवरील कुस्तीसाठी आखाडा सजविला आहे. बुधवारी सकाळी बैलगाडा शर्यती सुरू होतील. दुपारी साडेतीन वाजता शर्यतीची अंतिम फेरी होईल. रात्री पालखी मिरवणूक निघेल. गुरुवारी सकाळी नऊ वाजता चक्री भजन सुरू होईल. दुपारी दोन वाजता कुस्त्यांचे सामने सुरू होतील. शनिवार (ता. ५) व रविवारीही (ता. ६) बैलगाडा शर्यती होतील. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खेळणी व खाद्यपदार्थांची दुकाने थाटली आहेत. दरम्यान, २१ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या कीर्तन सप्ताहाचा सोमवारी (ता. २८) समारोप झाला.