चुकीच्या निकालाविरोधात विद्यार्थी परिषेदेचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चुकीच्या निकालाविरोधात
विद्यार्थी परिषेदेचे आंदोलन
चुकीच्या निकालाविरोधात विद्यार्थी परिषेदेचे आंदोलन

चुकीच्या निकालाविरोधात विद्यार्थी परिषेदेचे आंदोलन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ ः चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयामध्ये चुकीचा निकाल लावल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. परीक्षा दिलेल्या एमएस्सीसीच्या विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाइन पद्धतीने न भरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर नापास म्हणून शिक्का मारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थ्यांनी तक्रार करून दहा महिने उलटूनही महाविद्यालयाकडून दखल घेतली नाही. ९० विद्यार्थ्यांचा गुणपत्रिकेत झालेल्या गोंधळाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र आंदोलन केले.
यात महानगरमंत्री संभाजी शेंडगे, आकुर्डी नगरमंत्री ऋत्विक देशपांडे, हिंजवडी नगरसहमंत्री सिद्धेश्वर लाड, महानगर सहमंत्री अथर्व देवकर, अशोक सैनी, ऐश्वर्या वाघ, ओंकार इंगळे, अनिकेत गोळे, राष्ट्रीय छात्र शक्ती प्रमुख तेजस चवरे तसेच महाविद्यालयातील ऐश्वर्या चव्हाण, प्रसाद शेलार, आकाश अगरवाल, आकाश जगधने, लोकेश भोसले सह अन्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी अकराच्या सुमारास विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या आवारात नियोजनशून्य कारभाराविरोधात घोषणा दिल्या.
एमएसस्सीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणात महाविद्यालयातील शिक्षकांनी ९० विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाइन पद्धतीने न भरल्यामुळे त्यांचा निकाल विद्यापीठाने राखीव ठेवला होता व त्या विद्यार्थ्यांचा गुण पत्रिकेवर नापास असा शिक्का देण्यात आला. तृतीय सत्राचे गुण शिक्षकांनी चतुर्थ सत्रामध्ये न भरल्यामुळे हा सर्व प्रकार घडला. यास कॉलेजच्या बेजबाबदारपणामुळे हे घडले आहे. दरम्यान, या प्रकरणाची सर्व जबाबदारी महाविद्यालयाने घेतली असून, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत दुरुस्ती करून देण्याचे लेखी स्वरूपामध्ये मान्य केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

कोट

काही विद्यार्थांच्या निकालासमोर स्टार लागलेला आहे. निकालात दुरुस्ती लवकर करण्यात येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकर काम होईल.’
- दीपक शहा, सचिव प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्‍टिट्युट, चिंचवड

वड

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top