गहुंजे, चांदखेडमध्ये उन्हाळी सोयाबीन जोमात
सोमाटणे, ता. २४ ः प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी सोयबीन पीक घेण्याचा गहुंजे, चांदखेड येथील शेतकऱ्यांचा प्रयोग यशस्वी ठरला असून, उत्पादनही चांगले होणार असल्याचे चित्र आहे.
सोयाबीन हे पावसाळी व केवळ तीन महिन्यांचे पीक असल्याने दरवर्षी मावळातील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात सोयाबीनचे उत्पादन घेतात. हे पीक उन्हाळ्यात येऊ शकते का, यावर विचार करुन गहुंजे येथील शेतकरी रामकिसन बोडके व चांदखेड येथील शेतकरी संतोष गायकवाड यांनी प्रथमच यावर्षी उन्हाळी सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. या पिकाला आवश्यकतेनुसार पेरणीपूर्वी शेणखत व खुरपणीनंतर एकदाच रासायनिक खत घातल्याने पिकाची चांगली वाढ झाली आहे.
सध्या पिकाला पूर्ण क्षमतेने शेंगा आल्या असून दाणे भरणी पूर्ण झाली आहे. शेतक-यांच्या मतानुसार दोन आठवड्यांत पीक काढणीला येणार आहे. याबाबत प्रगतशील शेतकरी नितीन गायकवाड म्हणाले, ‘‘जास्त तापमानामुळे पावसाळी सोयाबीन पिकापेक्षा या उन्हाळी सोयाबीन पिकाच्या उत्पादनात तीस टक्के घट होऊ शकते. तरीही नव्वद दिवस इतक्या कमी कालावधीचे हे पीक असल्याने शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. किमान एकरी सात आठ क्विंटल सोयाबीन पीक निघेल.’’
----------------------------
गहुंजे ः दाणे भरणीला आलेले सोयाबीनचे पीक.
Smt23Sf1.
--------------------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.