
पिंपरीत अभियंता तरुणीवर पोलिसाकडून अत्याचार
पिंपरी - अश्लील फोटो, (Pornographic Photos) व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) करण्याची धमकी (Threat) देत पुणे शहर पोलिस दलातील शिपायाने )Police Peon) अभियंता तरुणीवर (Girl) लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केला. याप्रकरणी आरोपीला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.
विक्रम गणपत फडतरे (वय ३८, भिलारे वस्ती, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पुणे शहर पोलिस दलात वाहतूक शाखेत शिपाई पदावर कार्यरत आहे. याप्रकरणी ३० वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या अभियंता असून, एका कंपनीत नोकरीला आहेत. आरोपीने फिर्यादी यांना फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री वाढवली. त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून, त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ बनवले. हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..