
धुळ्याचे बियाणी महाविद्यालय विजेते मोरवाडीत आॅनलाईन अभिरूप न्यायालय स्पर्धा
पिंपरी, ता. २४ : श्रीमती सुभद्रा भोसले, एस. एन. बी. पी. विधी महाविद्यालय, पिंपरी मोरवाडीत २२ व २३ एप्रिल रोजी पहिली ऑनलाइन अभिरूप न्यायालय (मूट कोर्ट) स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन एस. ई. सोसायटीचे संस्थापक सचिव डी. के. भोसले, ॲड. ऋतुजा भोसले, प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप यांच्या उपस्थितीत झाले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते झाला. या स्पर्धेत बियाणी लॉ कॉलेज धुळे या महाविद्यालयाने प्रथम क्रमांकांचे पारितोषिक मिळवले. तर, प्रथम उपविजेते न्यू लॉ कॉलेज, भारती विद्यापीठ, दुसरे उपविजेते सविता स्कूल ऑफ लॉ, तमिळनाडू यांनी पटकाविला. भारती विद्यापीठाच्या भाव्या नारायण यांनी सर्वोत्कृष्ट वकील हा किताब पटकाविला. तर, सर्वोत्कृष्ट मेमोरियल बियाणी लॉ कॉलेज या महाविद्यालयाने मिळविले. न्यायाधीश म्हणून सहायक प्रा. कश्मिरा लोणकर, ॲड. हेमंत चव्हाण, डॉ. दामोदर हाके, क्रिस्टी ब्युरो, डॉ. रेखा पहुजा, ॲड. अरुण विग्मल, डॉ. दीपा पातुरकर, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सत्यनारायण नवदर, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील विलास तापकीर यांनी कामकाज पाहिले.
सत्यनारायण नवदर यांनी विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे. प्रभावी संप्रेषण व संभाषण, वाचन, विधी क्षेत्रातील मूलभूत संकल्पना समजून घेणे, संयम, ध्येयासक्ती, सामाजिक ज्ञान आत्मसात केले पाहिजे, असे सांगितले. तसेच, विलास तापकीर यांनी यशस्वी वकील होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कायद्याच्या पुस्तकाबरोबर अवांतर वाचन केले पाहिजे. तसेच, पुढील पिढीसाठी, समाजासाठी वकीलांनी सतत कार्यरत राहिले पाहिजे. पीडितांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
ॲड. ऋतुजा भोसले यांनी मूट कोर्टमुळे विद्यार्थ्यांचे विधीविषयक ज्ञानात भर पडते. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास प्राप्त होतो, असे सांगितले.
फोटो ः 59385
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..