
नवीन पोलिस आयुक्तांची पोलिस ठाण्याला भेट
पिंपरी, ता. २४ : नवीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सूत्र हाती घेताच कामाचा धडाका सुरु केला आहे. अधिकाऱ्यांनी आयुक्तालयात येऊन कामकाजाची माहिती देण्याऐवजी मीच पोलिस ठाण्यात येऊन कामाचा आढावा घेईल, असे पहिल्याच दिवशी त्यांनी सूतोवाच केले होते. त्यानुसार त्यांनी शनिवारी (ता. २३) हिंजवडी पोलिस ठाण्यास सरप्राईज व्हिजिट देत कामकाजाचा आढावा घेतला. आयुक्तालयाच्या हद्दीतील ही पहिलीच भेट ठरली.
अंकुश शिंदे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी आयुक्तालयाच्या इमारतीतील विविध विभागांना भेट देत कामकाजाची माहिती घेतली. सकाळी साडे नऊलाच ते आयुक्तालयात दाखल होऊन, कामकाजाला सुरुवात करीत असल्याने इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही धांदल उडत आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी आयुक्तालयात येऊन कामकाजाची माहिती देण्याऐवजी आपणच प्रत्यक्ष ठाण्यात येऊन आढावा घेणार असल्याचे त्यांनी पहिल्याच दिवशीही सूतोवाच केले होते. त्यानुसार शनिवारी त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्याला भेट दिली. ठाण्याची हद्द, संवेदनशील ठिकाणे, रेकॉर्डवरील गुन्हगारांची माहिती, राजकीय पदाधिकारी व गुन्हेगार , दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण, मनुष्यबळ, कामकाजाचे वाटप आदींची माहिती घेतली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..