पसंती क्रमांकाच्या हौसेला मोल नाही दोन वर्षात ‘आरटीओ’ला २३ कोटींचे उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पसंती क्रमांकाच्या 
हौसेला मोल नाही 
दोन वर्षात ‘आरटीओ’ला २३ कोटींचे उत्पन्न
पसंती क्रमांकाच्या हौसेला मोल नाही दोन वर्षात ‘आरटीओ’ला २३ कोटींचे उत्पन्न

पसंती क्रमांकाच्या हौसेला मोल नाही दोन वर्षात ‘आरटीओ’ला २३ कोटींचे उत्पन्न

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ : ‘माझा लकी नंबर अमूक-अमूक आहे,’ ‘मला माझ्या जन्मतारखेवरुन माझ्या वाहनाचा नंबर हवाय.’ ‘माझा शुभ आकडा अमूक आहे.’ ‘माझ्या कुटुंबात सर्वांचा वाहन नंबर मला एकच हवा आहे.’ ‘आमची ओळख वाहनांच्या या अंकावरुनच समजते.’ ‘राजकारणात माझं अमूक-तमुक पद आहे.’ ‘माझ्या वाहनाच्या नंबरवरुन मला सगळे ओळखतात.’ ‘माझ्या मुलाच्या जन्मतारखेवरुन मला वाहनाचा नंबर हवाय...’ अशा एक ना अनेक कारणांमुळे पसंतीच्या (चॉइस) क्रमांकाची धनदांडग्यांची मागणी पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढली आहे. २०२०-२१ या वर्षात आरटीओला यामाध्यमातून ९ कोटी, व २०२१-२२ मध्ये तब्बल १४ कोटीं असे मिळून दोन वर्षांत २३ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम, आर ५४ अंतर्गत, व्हीआयपी म्हणजेच पसंती क्रमांकासाठीचे अर्ज स्वीकारले जातात. २०२०-२१ मध्ये पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला ९ कोटी ४४ लाख १२ हजार ५०० तर, २०२१-२२ या वर्षात १३ कोटी ८१ लाख ३४ हजार ५०० रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. मात्र, याचा दुरुपयोग म्हणजे अनेक गुन्हेगार पसंतीचा बनावट क्रमांक वापरतात. फॅन्सी नंबर प्लेट वाहनांना बसवून त्याचा गुन्ह्यांमध्ये देखील वापर करतात. परिणामी, ही वाहने व आरोपी तत्काळ सापडत नाहीत. त्यामुळे, नंबर प्लेट बनविताना संबंधित वाहनांचे कागदपत्रे तपासून तसेच स्वतंत्र नोंदवही ठेवून त्यात नंबर प्लेटनुसार वाहनांच्या नोंदी नंबर प्लेट बनविणाऱ्या दुकानदारांकडे असणे बंधनकारक आहे. फॅन्सी नंबर प्लेट बनवून दिल्यानंतर दुकानचालकांवर कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना वाहनांमध्ये फेरबदल करीत असतात. नमुन्यातील नंबर प्लेटऐवजी त्यामध्ये बदल करून फॅन्सी क्रमांकाच्या नंबर प्लेट वापरतात.

कोरोना काळात आरटीओचा महसूल कामकाज बंद असल्याने बुडाला. मात्र, कोरोना काळानंतर परिस्थिती पूर्वपदावर येताच वाहनांच्या लिलावातून पसंती क्रमांक घेणे पुन्हा सुरु झाले. यातून आरटीओला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. एखाद्या सिरीजमध्ये हवा तो वाहन क्रमांक उपलब्ध नसल्यास त्यासाठी जास्त शुल्क वाहनधारकाला भरावे लागते. त्यामुळे, प्रतिष्ठेसाठी देखील पैसे मोजण्याची तयारी हौशी नागरिकांची आहे.
-चौकट--
चौघांकडून १७ लाख रुपये
पिंपर-चिंचवडकरांच्या हौसेला मोल नाही. २०२१ ते २०२२ या कालावधीत चार जणांनी मिळून १७ लाख रुपये भरले आहे. यासाठी वाहनमालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
---
१ एप्रिल ते ३१ मार्च २०२२ पर्यंत पसंती क्रमांकाच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न :
शुल्क अर्जदार संख्या उत्पन्न
३००० १९९८ ५९९४०००
४००० ३३५६ १३४२४०००
५००० ३३५९ १६७९५०००
७५०० २९२४ २१९३००००
१००० २१३ २१३००००
१२००० १६२ १९४४०००
१५००० ९१६ १३७४००००
२०००० २० ४०००००
२२५०० १०४३ २३४६७५००
३०००० ५ १५००००
४५००० ३३२ १४९४००००
५०००० १२९ ६४५००००
४५००० ३३२ १४९४०००
५००० १२९ ६४५००००
६०००० २ १२००००
७०००० ४३ ३०१००००
१५०००० ६७ १००५००००
२१०००० ९ १८९००००
४००००० २ ८०००००

४५०००० २ ९०००००

--------
एकूण : १४५८२ १३८१३४५००
---

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top