
तुकोबारायांच्या पालखीचे वीस जूनला प्रस्थान
देहू, ता. २५ ः यंदा आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २० जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पालखी सोहळा प्रमुखपदी संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे आणि संतोष महाराज मोरे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी निवड केली आहे.
यावर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३३७ वा पालखी सोहळा आहे. या सोहळ्यासाठी विश्वस्त संतोष महाराज मोरे,
विशाल महाराज मोरे आणि माणिक महाराज मोरे यांची निवड संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी केली. या वेळी संस्थानचे विश्वस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे व भानुदास महाराज मोरे उपस्थित होते.
फोटोओळः माणिक महाराज मोरे(डीयूएच24पी401114).
2) विशाल मोरे(डीयूएच24पी401113).
3) संतोष मोरे(डीयूएच24पी401112).
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..