
शहरात कांदा झाला स्वस्त
पिंपरी, ता. २४ : इंधनाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. महागाई वाढली आहे. मात्र, फळभाज्या व पालेभाज्यांचे भाव समाधानकारक होते. पालेभाज्यांची आवकही समाधानकारक होती. पिंपरीतील लालबहाद्दूर शास्त्री मंडईत वांगे, कांदे, बटाटे, भेंडी, काकडी, टोमॅटो यांचेही दर कमी झाल्याचे दिसले. मात्र, उन्हाचा तडाखा व बदलत्या दमट हवामानामुळे भाज्या सडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, भाजीपाला काही प्रमाणात वाया जात आहे.
मार्चमध्ये शेवग्याची शेंग महागली होती. त्याचे दरही कमी झाले आहेत. ६० रुपये किलोने विक्री होणारे वांगे ३० रुपये किलोने झाली आहेत. कांदे २० ते २५ रुपये, तर भेंडी ४० रुपये किलोने मिळत आहे. हवामानात काही प्रमाणात बदल होत असल्याने तसेच दमट वातावरण व उन्हामुळे भाजीपाला सडण्याचेही प्रमाण वाढले आहे. भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होत असल्यामुळे बाजारपेठेत आवक वाढली आहे. अजून एक ते दोन आठवडे दर स्थिर राहणार असून, उत्पादन कमी झाल्यावर भाजी पाल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.
-----------
फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो) :
बटाटे : २० ते २५, कांदे : २०, टोमॅटो : २०-२५, गवार : ८० ते ९०, कोबी : २०, शेवगा : ५०-६०, हिरवी मिरची : १००-१२०, शिमला मिरची : ३० ते ४०, पडवळ : ६० ते ६५, दोडका : ४०, घोसाळी : ४०, आले : ४०, भेंडी : ३० ते ४०, वांगी : ४०, भोपळा : ३०, दुधी भोपळा : ३० ते ३५, राजमा : ६०, तोंडली : ६०, चवळई : ४०, बीट : ३०-४० गाजर : ३०, कैरी ( तोतापुरी) : ५०-६०, काकडी : ३० ते ३५, मटार (वाटाणा) : ६०, कारली : ४०-४५, फ्लॉवर : ४०, बीन्स : ६०
---
पालेभाज्यांचे भाव (प्रति गड्डी) :
कोथिंबीर : १० ते १५, मेथी : १५ ते २०, शेपू : १०-१२, पुदिना : ५-७, कांदापात : २०, गवती चहा : ६ ते ७, पालक : १०
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..