
चोरट्यांनी एटीएम कार्ड हिसकावून ज्वेलर्समध्ये पेमेंट करण्यासह काढले एक लाख
एटीएम कार्ड हिसकावून
केले सराफाचे पेमेंट
पिंपरी, ता. २५ : एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीकडील एटीएम कार्ड हिसकावून दोघेजण पसार झाले. त्यानंतर त्या कार्डद्वारे एका ज्वेलर्समध्ये ९९ हजारांचे पेमेंट केले. तसेच एटीएमधून दहा वेळा दहा हजार असे एक लाख रुपये काढले. हा प्रकार देहूगाव येथे घडला.
याप्रकरणी संजय प्रकाश डवले (रा. शिवनगरी, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे रविवारी (ता. २४) देहू-आळंदी रोडवरील श्री संत तुकाराम बाजारपेठेसमोरील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एटीएममधून पैसे न आल्याने फिर्यादीजवळ थांबलेल्या दोघांनी फिर्यादीला कार्ड दाखविण्यास सांगितले. मात्र, फिर्यादीने कार्ड न दाखविल्याने जबरदस्तीने फिर्यादीच्या हातातील एटीएम कार्ड हिसकावून आरोपी पसार झाले. त्यानंतर फिर्यादी यांच्या खात्यातून देहूगावातील एका ज्वेलर्समध्ये ९९ हजार रुपयांचे पेमेंट केले. तसेच माळवाडीतील एटीएममधून दहा वेळा दहा हजार असे एकूण एक लाख रुपये काढले. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..