
छत्रपती शिवाजी महाराज चौक पोलिसांकडून वाऱ्यावर
तळेगाव स्टेशन, ता. १४ : यशवंतनगरमधील दिवसरात्र गजबजलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक तळेगाव दाभाडे पोलिसांनी वाऱ्यावर सोडण्यासारखी परिस्थिती आहे. सकाळी अनधिकृत भाजी विक्रेते आणि सायंकाळनंतर टवाळखोर तरुणांच्या गराड्यात हरवणाऱ्या या चौकात कायम रस्त्यावर गाड्या लाऊन लोक चहा, फास्ट फूड आणि आइस्क्रीमचा आस्वाद घेतात. त्यामुळे कायम वाहतूक कोंडी होते. चहाच्या दुकानासमोर रस्त्यावर तासनतास उभे राहून टवाळखोर तरुण गप्पा मारत असतात. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना येथून चालणे मुश्कील बनले आहे. वारंवार विनंत्या करूनही दाभाडे पोलिस अभावानेच इकडे फिरवतात. परिणामी पोलिस गस्त ढिली पडल्यामुळे स्टेशन परिसरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी नेमून वाहतूक आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची यशवंतनगरमधील नागरिकांची मागणी आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..