जेवणाच्या ब्रेकच्या एक तासाचे  ५० रुपये कपात

जेवणाच्या ब्रेकच्या एक तासाचे ५० रुपये कपात

पिंपरी, ता. ४ : ‘‘हमें मेहनत के काम कुछ भी मोबदला नहीं मिलता. बारा घंटा काम करना पडता है, सुबह आठसे लेकर शाम के आठ बजे तक. खाने में एक घंटे का ब्रेक लेते हैं। तो ठेकेदार पैसे कट करवा देता है। महिने का पगार एक या दो तारीख को कभी भी नहीं मिलता। १५ तारीख आ जाती है. तो कॅश देते हैं हमें. बिमार पडे तो दवाखाने में ले जाते हैं। पर, रहने और खाने का खर्चा बहुत आता हैं। हाथ में बारा हजार पगार आती हैं, कैसे काम करें?’’ अशी व्यथा महामेट्रोमध्ये शारीरिक कष्टाचे काम करणाऱ्या एका मिस्त्रीने व्यक्त केली.

सध्या पिंपरी-चिंचवड मेट्रोचे रस्त्यावर काम सुरु आहे. जीव धोक्यात घालून ज्या कामगारांमुळे मेट्रो उभी राहिली आहे, त्यांच्याच पदरी हालअपेष्टा आल्या आहेत. सध्या ७०० ते ८०० कामगार मेट्रोच्या ठिकाणी काम करत आहेत. असे दहा ते बारा युनिट ठिकठिकाणी आहेत. प्रत्येक ठिकाणचे ठेकेदार वेगळे आहेत. परंतु, कामगारांना मिळणारी वागणूक एकाच प्रकारची आहे.

शारीरिक मेहनतीचे बारा तास काम करणाऱ्या कुशल आणि अकुशल मेट्रो कामगारांना महिन्याकाठी वेळेत पगार मिळत नाही. तसेच, जेवणासाठी एक तास ब्रेक घेतल्याने त्या वेळचा पगार कपात करण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे. महामेट्रोच्या ठेकेदारांकडून अशी पिळवणूक होत असल्याने करोडो रुपयांची गुंतवणूक असलेल्या मेट्रोकडून मात्र, कामगारच वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. यातील बरेच कामगार परप्रांतीय आहेत. गावाकडे घरखर्चासाठी पैसे पाठवावे लागतात. एका ठिकाणचे काम संपले की, लगेच दुसरीकडे त्यांना पाठविण्यात येणार आहे. त्यांना पीएफ, इएसआय सारख्या कोणत्याही सवलती मिळत नाही.
---
‘आम्ही राहतो त्या ठिकाणी पाण्याची सोय देखील नाही. सकाळी अंघोळ करायला आणि स्वयंपाक बनवायला देखील पाणी नसते. तशा अवस्थेत कामावर आल्यानंतर कामावरही पिण्याच्या पाण्याची सोय नाही. घशाला कोरड पडते. सात महिन्यांपासून हीच परिस्थिती आहे. जेवणासाठी ब्रेक मिळतो त्याचे दररोजचे ठेकेदार ५० रुपये कपात करत आहे. कामाच्या ठिकाणी ग्लोव्हज आणि मास्क देखील मिळत नाही. दिवसभर कामाचा ताण खूप असतो.’
- एक फिटर, मेट्रो कामगार
--
एवढा मिळतो दिवसाचा पगार
मिस्त्री : ६५०
फिटर : ५५०
हेल्पर : ५५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com