कॉल सेंटरवर गप्पा; रुग्ण ‘वेटिंग’वर; उरो रूग्णालयातील प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pregnant women
रूग्ण ‘वेटिंग’वर

कॉल सेंटरवर गप्पा; रुग्ण ‘वेटिंग’वर; उरो रूग्णालयातील प्रकार

पिंपरी - ‘माझी पत्नी आठ महिन्याची गर्भवती. अचानक पोटात दुखू लागल्‍याने रुग्णवाहिकेसाठी औंध उरो रूग्णालयातील (Aundh Uro Hospital) १०२ क्रमांक फिरवला. क्रमांक सातत्याने ‘बिझी’ लागत होता. रिस्क न घेता पत्नीला खासगी रुग्णवाहिकेतून दवाखान्यात (Hospital) हलवले. एक तास फोन व्यग्र लागत असेल तर रुग्णांना रुग्णवाहिका (Ambulance) मिळणार कशी? अशी तक्रार संतोष जोगदंड (नाव बदलेले) यांनी कंपनीकडे केली. अशाप्रकारे संबंधित कॉल सेंटरमधील महिला कर्मचारी १०२ वर तासनतास गप्पा मारत असल्याने रुग्ण ‘वेटिंग’वर राहत प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित कंपनीने कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केल्याचे समजते.

औंध ग्रामीण उरो शासकीय रुग्णालयात ट्रान्स ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत ‘कॉल सेंटर’ चालविण्यात येत आहे. गर्भवती महिला व नवजात शिशू यांच्यासाठी सरकारची १०२ ही आपत्कालीन हेल्पलाइन आहे. जननी शिशू सुरक्षा अभियानार्गत ही १०२ रुग्णवाहिका कराराने काम करते. त्यानुसार या रूग्णालयात कॉल सेंटर कार्यरत आहे. हे कार्यालय ३४ जिल्ह्याचे मध्यवर्ती कार्यालय असून, येथून महाराष्ट्र राज्यभरातील गर्भवती महिला व नवजात शिशू यांना सेवा पुरवली जाते. दररोज २५ हजारांहून अधिक ‘कॉल’ येतात. त्यासाठी ५० पेक्षा अधिक महिला व पुरुष कर्मचारी येथे काम करीत आहे. मात्र, फेब्रुवारी २०२२ या महिन्यांपासून आपत्कालीन सेवा खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या.

परिस्थिती तपासल्यानंतर पूर्वीच्या कंपनीकडे काम करत असलेल्या आयटीटेक असलेला पुरुष कर्मचारी हा चार ऑपरेटर महिला कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून आपत्कालीन सेवा बंद पाडत असल्याची माहिती समोर आली. यातील एका महिला कर्मचाऱ्याचा नातेवाईक असलेला एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी या महिलांना फोन करून तासनतास गप्पा मारत बसायचा. हा प्रकार तपासणीअंती समोर आल्यावर कंपनीने महिला कर्मचाऱ्यांना दोन वेळा तोंडी समज दिली. तरीदेखील त्यांच्या वागणुकीत सुधारणा दिसली नाही. त्यांच्याकडून लेखी स्वरूपात माफीनामा कंपनीने लिहून घेतला. त्या पत्रात कर्मचाऱ्यांनी गैरवर्तणुकीची कबुली दिली आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली आहे. राजकीय पदाधिकारी मात्र उजळ माथ्याने फिरत असल्याची चर्चा रंगली आहे.

‘महिला कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही कंपनीची गोपनीय माहिती ‘लिक’ केली होती. त्यांना वेळोवेळी समज देऊनदेखील त्यांच्या वागणुकीत सुधारणा दिसली नाही. त्यांना एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा फोन यायचा आणि गप्पा मारत असायच्या. त्‍यामुळे सिस्टिम बिझी व्हायची. या गंभीर प्रकाराची दखल घेतली असून, त्यांना कामावरून कमी केले आहे.’

- माधव पाटील, कार्यक्रम अधिकारी ट्रान्स ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top