तडीपार आरोपी हत्यारांसह बिनधास्त पोलिसांची कारवाई केवळ कागदोपत्री राहत असल्याची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तडीपार आरोपी हत्यारांसह बिनधास्त 
पोलिसांची कारवाई केवळ कागदोपत्री राहत असल्याची चर्चा
तडीपार आरोपी हत्यारांसह बिनधास्त पोलिसांची कारवाई केवळ कागदोपत्री राहत असल्याची चर्चा

तडीपार आरोपी हत्यारांसह बिनधास्त पोलिसांची कारवाई केवळ कागदोपत्री राहत असल्याची चर्चा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३१ : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना तडीपार केले जात असले तरी हे आरोपी बिनधास्तपणे हद्दीत येत असल्याचे दिसून येते. पिस्तूल, कोयत्यासह हे आरोपी वावरत असल्याचे पोलिसांनीच केलेल्या कारवाईतून स्पष्ट होते. यावरून पोलिसांची तडीपार कारवाई केवळ कागदोपत्रीच राहत असल्याचे दिसून येते.

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या, उपद्रव ठरणाऱ्या आरोपींवर तडीपार कारवाई केली जाते. या आरोपींना ठराविक कालावधीसाठी त्याला निश्चित करून दिलेल्या भौगोलिक सीमेबाहेर राहणे बंधनकारक असते. अशाप्रकारे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून जानेवारी २०२२ पर्यंत विविध ठाण्यांच्या हद्दीतील
२१५ जणांना तडीपार करण्यात आले आहे. या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी एक्स ट्रॅकर ऍप तयार केले आहे. यावरून पोलिसांनी दररोज या आरोपीच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. त्यांचे लोकेशन तपासणे, त्याचा सेल्फी मागविणे, आरोपीची माहिती ठेवणे यासाठी पोलिसांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, एकीकडे पोलिसांकडून हवा तसा पाठपुरावा होत नाही. तर दुसरीकडे आरोपीही पोलिसांच्या वरचढ आहेत. मोबाईल बंद पडला, नेटवर्क नाही आदी कारणे देत पोलिसांना गुंगारा देत असल्याचे दिसून येते. त्यानंतर हे आरोपी आयुक्तालयाच्या हद्दीत येऊन हत्यारासह गंभीर गुन्हे करीत असल्याचे समोर आले आहे. अशा आरोपींचा उपद्रव सध्या वाढत आहे.
तीन महिन्यापूर्वी तडीपार आरोपीने हद्दीत येत भरदिवसा एकाचा खून केल्याची घटना पिंपळे गुरव येथे घडली. तर तडीपार आरोपींनी पोलिसांशी झटपट करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही दोन वेगवेगळे प्रकार घडले आहेत.

--------
गुन्हेगारांचे वाढते धाडस

पोलिसांकडून आरोपीवर केवळ कागदोपत्री कारवाई करण्यात धन्यता मानली जाते. मात्र, त्यानंतर त्याकडे गांभीर्याने पहिले जात नाही. त्यामुळे या गुन्हेगारांचेही धाडस वाढत आहे. त्यामुळे कारवाईचा काय उपयोग असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
--------------------
मार्च महिन्यातील घटना

अतिश गोरख गायकवाड (रा. निगडी) याला दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही तो हद्दीत आला. त्याच्यासह साथीदाराकडून पिस्तूल व काडतुसे जप्त केली. पवन बंडू शिरसाठ (रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी ) व अजय आश्रुबा दुनघव (रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी ) या दोघांनाही तडीपार केले असतानाही ते हद्दीत आले. त्यांच्याकडून कोयता व तलवार जप्त केली.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top