
गुंतविलेल्या रकमेवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून ८५ लाखांची फसवणूक
दुप्पट परताव्याचे आमिषाने
८५ लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. १ : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात पैसे गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून एकाने ८५ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील हॉटेल रानमळा येथे घडली.
याप्रकरणी महेंद्र महादू वाघेरे (वय ४४, रा. गायत्री इलाईट्स, निगडी, प्राधिकरण) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश पांडुरंग पाळेकर (वय ४७, रा. वळवण, लोणावळा, ता. मावळ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी पाळेकर हा जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो. ''तुम्ही गुंतवणूक करा. गुंतवणूक केलेल्या पैशाची दोन ते तीन वर्षांमध्ये दामदुप्पट रक्कम देतो’, असे आरोपीने वाघेरे यांना आमिष दाखवले. त्यातून वाघेरे यांचा विश्वास संपादन करून ८५ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------------
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..