
निगडीत महिला सक्षमीकरणासाठी वुइ रन
महिला सक्षमीकरणासाठी
निगडीत वुई रन’
पिंपरी, ता. १ : निगडीत महिला सक्षमीकरणासाठी पीसीएमसी रनर्स, पीसीमसी स्मार्ट सारथीच्यावतीने वुई रन’ ही स्पर्धा संजय काळे ग्राउंडवर विविध वयोगटासाठी भरविण्यात आली होती. स्पर्धेत एक हजार स्त्रिया, मुली व लहान मुलांनी सहभाग नोंदवला.
या अंतर्गत सहभागी स्पर्धकांना पदक, टी शर्ट, नाष्टा देण्यात आला. सर्वानी स्पर्धेचा भरपूर आनंद घेतला. या रनमध्ये ५ व १० किलोमीटर असे दोन प्रकार होते. वयानुसार १२ स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माई बाल भवन संस्थेच्या दृष्टिहीन मुलींनी सुद्धा स्पर्धेत भाग घेतला. या उपक्रमात वर्गणीतून माई बाल भवनला ५१ हजार व कॅन्सर संस्थेला २१ हजार रुपयांची मदत करण्यात आली. तेजपाल रांका, सोलरिस यांची स्पर्धेला मदत झाली. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..