
मार्चअखेर अडीच हजार कोटींची बिले अदा सर्वाधिक स्थापत्यवर खर्च : वायसीएमसाठी १०१ कोटी
पिंपरी, ता. ८ : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील कामांसाठी नियुक्त ठेकेदाराला सुमारे अडीच हजार कोटींची बिले अदा केली आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये दोन हजार ३६४ कोटी रुपयांची बिले ठेकेदारांना दिली आहेत. त्यामध्ये, सर्वाधिक १०५२ कोटी रुपये स्थापत्यच्या ठेकेदारांना व वायसीएमसाठी १०१ कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेतील विविध विभागांच्या कामासाठी अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार खर्च केला जातो. खर्चामध्ये भांडवली व महसुली खर्चाचा समावेश आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये भांडवली कामासाठी दोन हजार ३६४ कोटी २८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्या संबंधित ठेकेदारांना ३१ मार्चअखेर बिल अदा केले. स्थापत्य विभागासाठी १०५२ कोटी रुपये खर्च झाला. त्यानंतर सर्वाधिक आरोग्यासाठी ३०९ कोटी १६ लाख व भांडार विभागातील ठेकेदारांना २७६ कोटी १६ लाख रुपये तर, पाणीपुरवठा विभागासाठी २९५ कोटी रुपये खर्च झाला आहे.
२०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये सुमारे चार हजार कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. त्यापैकी, दोन हजार ३६४ कोटी रुपयांचे मार्चअखेर बिल अदा केले आहे. तर, महापालिकेमधील कर्मचाऱ्यांच्या पगारावर सुमारे ८५० कोटी रुपये खर्च होत आहे. शहरात इंदौर पॅटर्न राबवण्यात येत आहे. त्यामुळे, स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. रंगरंगोटी तसेच स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे, यावर्षी आरोग्याच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. यावर्षी ३०९ कोटी १६ लाख रुपयांचा खर्च आरोग्य विभागावर झालेला आहे. तसेच, विद्युत विभागासाठी १११ कोटी ७२ लाख व पर्यावरण विभागासाठी ३७ कोटी ७७ लाख रुपये इतका खर्च झाला आहे.
--
वैद्यकीयसाठी दोनशे कोटींची बिले
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांसाठी मोठ्या सोयीसुविधा उभारण्यात आल्या होत्या. कोविड केअर सेंटर, औषधे, नवीन रुग्णालयांमध्ये संसाधने खरेदी केली. तसेच २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये उभारलेल्या सोयीसुविधांची बिले देखील या आर्थिक वर्षामध्ये दिली आहेत. वैद्यकीय विभागावर १०१ कोटी ४७ लाख रुपये खर्च केला आहे. तर वायसीएम रुग्णालयासाठी १०१ कोटी रुपये खर्च झाला आहे.
--
विभागानुसार अदा केलेली बिले
विभाग रक्कम
स्थापत्य १०५२ कोटी
विद्युत १११ कोटी ७२ लाख
पर्यावरण ३७ कोटी ७७ लाख
पाणीपुरवठा २९५ कोटी
भूसंपादन ८० कोटी
भांडार २७६ कोटी १६ लाख
आरोग्य ३०९ कोटी १६ लाख
वैद्यकीय१०१ कोटी ४७ लाख
वायसीएम १०१ कोटी
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..