
मावळात १८० हेक्टर क्षेत्राचे लक्ष्य
ऊर्से, ता. १० : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मावळ तालुक्यात १८० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कृषी सहायकामार्फत प्रस्ताव घेण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी पडीक जमिनीवर सलग लागवड, बांधावर लागवडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी केले आहे. इच्छुक लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले प्रकरण कषी सहायक यांच्यामार्फत मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयास पाठवून मंजुरी घ्यावी. शेतकऱ्यांना फळझाडे लागवडीसाठी मजुरी व सामग्रीसाठी अनुदान दिले जाते, असे कृषी सहायक विकास गोसावी
यांनी सांगितले.
योजनेचा उद्देश :
- ग्रामीण भागातील अकुशल काम करणाऱ्या कुटुंबास वर्षाभरात १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी
- दारिद्र्य निर्मूलन करणे, आर्थिक व सामाजिक स्तर उंचावणे
- ग्रामीण विकास
- पर्यावरणाचे संरक्षण
- शहराकडे होणारे स्थलांतर थांबविणे
- पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण करणे
- ग्रामीण भागातील उत्पादकता वाढविणे
- रोजगार निर्मिती, कायमस्वरूपी टिकाऊ मालमत्तेची निर्मिती
आवश्यक कागदपत्रे ः
- शेतकरी जॉबकार्ड धारक असावा, वैयक्तिक लाभार्थी म्हणून या योजनेत लाभ घेण्यास पात्र
- जमीन असणे आवश्यक
- इच्छुक लाभार्थींनी विहित नमुन्यात अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल करावा
- ग्रामपंचायत व ग्रामसभा यांची मान्यता आवश्यक
- दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेत फळबाग लागवड करतात येईल
-शेतकऱ्यांचा ८ अ दोन हेक्टर पेक्षा कमी असावा
- जॉबकार्डवरील मजुराची राष्ट्रीयकृत बँकेत खाती असावीत
- आधारकार्ड आवश्यक
योजनेचे स्वरूप :-
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ नुसार अंमलबजावणी
- लोकांची, लोकांसाठी आणि लोकांकडून अंमलबजावणी होत असलेली योजना
- नियोजन व अंमलबजावणीमध्ये ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांचा महत्त्वपूर्ण सहभाग
‘‘शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. या योजनेमधून शेताच्या बांधावर, पडीक जमिनीवर सलग फळबाग लागवड करता येईल. या योजनेचे अनुदान शेतकऱ्याच्या बॅंकेच्या खात्यात जमा केले जाते.’’
- दत्तात्रेय पडवळ, तालुका कृषी अधिकारी, मावळ