परंदवडी येथील शाळेतील 
पाच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश

परंदवडी येथील शाळेतील पाच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश

ऊर्से, ता. १८ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये परंदवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले आहेत.
परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेची जिल्हा गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार शाळेतील इयत्ता पाचवीतील यशस्वी विद्यार्थी सुशांत सुनील भालशंकर (२५८ गुण), दीपाली राकेश कोळी (२४६ गुण), करण संतोष काकडे (२४० गुण), स्नेहल सुरेश साळुंखे (२३२ गुण), सोनाली भगवान गावडे (२३२ गुण) यांचा गुणवत्ता यादीत समावेश झालेला आहे. वर्गातील ३४ विद्यार्थ्यांपैकी २७ विद्यार्थी पात्र झाले असून २०० हून अधिक गुण मिळवणारे १३ विद्यार्थी आहेत. तर यातील सुशांत भालशंकर हा विद्यार्थी बेबडओहोळ केंद्रात प्रथम व मावळ तालुक्यात तृतीय आला आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका मनिषा सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक संतोष गायकवाड, केंद्रप्रमुख पोपटराव चौगुले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर भोते, सरपंच अलका पापळ, उपसरपंच बंडू चव्हाण, गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज, गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com