राज्य सरकार सर्पमित्रांना ओळखपत्र देण्याची शक्यता
संतोष थिटे ः सकाळ वृत्तसेवा
ऊर्से, ता.२५ : ग्रामीण भागात सर्प आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्पमित्रांना आता सरकारकडून अधिकृत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र आणि १० लाख रुपयांचा अपघात विमा देण्याचा निर्णय प्रक्रियेत आहे. मात्र, सरसकट ओळखपत्र देऊ नये. त्यामुळे अपघात होऊ शकतात याची दखल शासनाने घ्यावी, असे फ्रेन्ड्स ऑफ नेचर संस्थेकडून सांगण्यात आले आहे.
मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत बावनकुळे यांनी हा प्रस्ताव मांडला. या बैठकीला वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य वन्यजीव संरक्षक एम. श्रीनिवास राव, तसेच अखिल भारतीय सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष संभाजीराव पाटील उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, ‘‘सर्पमित्र हे ग्रामीण भागातील निसर्ग संरक्षणाचे खरे ‘फ्रंटलाइन वॉरिअर्स आहेत. ते केवळ सर्प पकडत नाहीत तर; ग्रामस्थांचे प्राण वाचवतात. अशा समर्पित कार्यासाठी त्यांना संरक्षण आणि सरकारी मान्यता देणे ही काळाची गरज आहे.’’
या निर्णयाअंतर्गत एक सविस्तर कार्यपद्धती (एसओपी) तयार केली जाणार आहे. सर्पमित्रांना अधिकृत ओळख मिळेल, त्यांचे कार्य दस्तऐवजीकरण होईल आणि त्यांना विमा संरक्षणाचा फायदा मिळेल.
वनविभागाच्या पोर्टलवर सर्पमित्रांची अधिकृत नोंदणी केली जाणार असून, नागरिकांना आपल्या परिसरातील सर्पमित्रांचा संपर्क सहज मिळावा. यासाठी एक स्वतंत्र डिजिटल पोर्टल तयार करण्यात येईल. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि वन्यजीव संरक्षणासाठी सर्पमित्रांचा सहभाग अधिक प्रभावी ठरेल, असे मत अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी व्यक्त केले.
‘तपासणी करून ओळखपत्र द्यावे’
याबाबत फ्रेन्ड्स ऑफ नेचर संस्थापक अध्यक्ष महाजन म्हणाले, ‘‘या घेतलेला निर्णय चांगला असून, याबाबत जे समाजात सर्पमित्र म्हणून काम पाहत आहे. त्यांनाच ओळखपत्र द्यावे अन्यथा साधारण माहिती असलेले कुणालाही ओळखपत्र देऊ नये, याची तपासणी करावी. त्याचबरोबर काही सर्पमित्र साप डांबून ठेवतात, त्यांचे हाल करतात. बराच वेळा ते मृत्युमुखी पण पडतात. या बाबत कायदाही आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी व्हावी याकडे पण शासनाने लक्ष दिले पाहिजे.’
‘सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र आणि १० लाख रुपयांचा अपघात विमा देण्याचा निर्णय घेतला जात असल्याने हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. सर्पमित्र आपला जीव धोक्यात घालून समाजात काम करत असतात. तसेच सरसकट ओळखपत्र देऊ नये, त्यामुळे अपघात होऊ शकतात.’
- महेश महाजन, फ्रेन्ड्स ऑफ नेचर, संस्थापक-अध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.