स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात ‘व्यसनरूपी रावणा’चे दहन
ऊर्से, ता. ६ : दसऱ्याच्या उत्साहात व्यसनरूपी ‘रावणा’चे दहन करत स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात प्रेरणादायी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक सणाला सामाजिक जाण आणि आत्मपरिवर्तनाची जोड देत या केंद्राने दसऱ्याला एक आगळावेगळा आणि हृदयस्पर्शी रंग दिला.
केंद्रातील रुग्णमित्र आणि कार्यकर्त्यांनी मिळून सणाला आशा आणि नवजीवनाचा संदेश दिला. व्यसनाच्या अंधकारातून मुक्त होण्याच्या प्रवासात या उत्सवाने प्रत्येकाला आपल्या अंतरातील ‘रावण’ जाळण्याची प्रेरणा दिली. या निमित्ताने ‘राम जन्म ते रावण वध’ या विषयावर आधारित एक भावस्पर्शी नाटिका सादर करण्यात आली. रुग्णमित्रांनी राम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि रावण यांसारख्या पात्रांना जिवंत करून दाखवले. नाटिकेनंतर प्रतीकात्मक रावण दहन सोहळा पार पडला. रावणाच्या ज्वाळांमध्ये प्रत्येक रुग्णमित्राने आपल्या व्यसनरूपी आणि स्वभावदोषरूपी रावणाचा अंत करण्याचा संकल्प केला. हा क्षण केवळ प्रतीकात्मक नव्हता, तर प्रत्येकाच्या जीवनातील आत्मजागर आणि नवप्रकाशाची सुरुवात होती.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियो नेटवर्क्सचे संस्थापक ऋषिकेश घारे, लोहगड-विसापूर विकास मंचचे संस्थापक सचिन टेकवडे आणि रोटरी क्लबचे दीपक फल्ले उपस्थित होते. स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे हर्षल जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी राहुल बोरुडे, प्रकाश धीडे, प्रणव देशमुख, अमोल कुलकर्णी, नितीन नाटेकर, अनिल सावंत, आनंद भागवत, जयंत खेर्डेकर, अजिंक्य देशपांडे, निलेश साळुंखे, राजेंद्र ढूस, अमेय कुलकर्णी, गणेश गुंडरे आदींनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.