पिंपरी-चिंचवड
पवन मावळात संस्कृतीचे दर्शन
ऊर्से : आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धकांचे पवन मावळातील डोणे, आढले, चांदखेड, बेबडओहळ, मळवंडी-ढोरे, शिवणे आदि गावांतील ग्रामपंचायत, शाळा, विविध बचत गटांकडून जल्लोषात स्वागत झाले. यानिमित्त गावातील मंडळे, ढोल ताशा पथकांनी संस्कृतीचे दर्शन घडविले. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा तालुक्यातील गावांमधून जात असल्याने सकाळपासून सर्व मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सर्व गावांतील लोकांनी उत्स्फूर्त साथ दिली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सायकली तसेच स्पर्धकांना पहाण्यासाठी उन्हात उभ्या होत्या. पोलिस व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
-----

