सोमाटणेत कारके दुसऱ्यांदा विजयी

सोमाटणेत कारके दुसऱ्यांदा विजयी
Published on

ऊर्से : सोमाटणे गणातून यंदा साहेबराव कारके यांची सदस्यपदी दुसऱ्यांदा भरघोस मतांनी निवड झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. भाजपला तालुक्यात पंचवीस वर्षांनंतर अपयश आले. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रारंभी फरक कमी-जास्त होता. सहाव्या, सातव्या फेरीनंतर कारके यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने ते विजयी घोषित झाले. कारके यांनी उर्से ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही कामकाज केले आहे. प्रारंभी ते शिवक्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नासंदर्भात काम करायचे. त्यानंतर त्यांनी राजकीय कारकिर्दीत सुरू केली. त्यांनी गटनेतेपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या विजयानंतर ग्रामदैवत श्री पद्मावती मंदिरातील प्रांगणात ग्रामस्थांनी गुलाल व भंडारा उधळत जल्लोष केला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com