Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwadsakal

Pimpri-Chinchwad - योग्य संस्कार असेल तरच; सुजाण नागरिक बनणे शक्य

नाटिकांच्या माध्यमातून मिशन रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जल स्वच्छ अभियान याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली.

Pimpri-Chinchwad Bhosari - ‘‘ज्याप्रमाणे एखाद्या बीजामध्ये विशाल वृक्ष होण्याची क्षमता असते. मात्र, गरज असते ती त्याला योग्य जमीन, खत, पाणी आणि पोषक वातावरण मिळण्याची. परंतु तेच बीज खडकावर पडले तर ते नाश होऊन जाते. त्याचप्रमाणे लहान मुलांनादेखील योग्य संस्कार मिळाले तर ती देखील समाजाला पोषक असे सुजाण नागरिक बनू शकतात.

Pimpri-Chinchwad
Pune News : मद्यपींवर आता राहणार पोलिसांची करडी नजर

अन्यथा संस्काराअभावी समाजाला घातक प्रवृत्ती तयार होताना दिसतात,’’ असे मत संत निरंकारी मंडळाचे अमृतपाल सिंह यांनी भोसरीतील संत निरंकारी भवनात संत निरंकारी मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बाल संत सत्संग सोहळ्यात व्यक्त केले. दिल्लीतील संत निरंकारी मंडळाचे मोहन छाब्रा, पुणे झोन प्रमुख ताराचंद करमचंदानी आदींसह लहान मुले-मुली, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Pimpri-Chinchwad
Mumbai Fraud : मुलांना रेल्वेत नोकरीच्या आमिषाने शेतकऱ्याची 12 लाखांची फसवणूक; पोलिसांकडून तपास सुरू

कार्यक्रमाचे आयोजन निरंकारी सद्‍गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. या वेळी मुला-मुलींनी गीत, अभंग, विचार, नृत्य, नाटिका यांद्वारे निरंकारी सद्‍गुरूंची शिकवण यावर प्रकाश टाकला.

Pimpri-Chinchwad
Mumbai Metro : मुंबई मेट्रोचे प्रवाशांना मिळणार विमा सुरक्षा कवच

नाटिकांच्या माध्यमातून मिशन रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, जल स्वच्छ अभियान याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली. सत्संगाचा इतिहास आणि शिकवण यावर प्रश्नमंजूषाही घेण्यात आली. सूत्रसंचालन प्रेरिता रावलानी आणि प्रथमेश साक्रूडकर या बालकांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com