भोसरीतील ६६ वर्षीय ‘तरुणा’चे ‘महाराष्ट्र दर्शन’

भोसरीतील ६६ वर्षीय ‘तरुणा’चे ‘महाराष्ट्र दर्शन’

Published on

भोसरी, ता. ३ : सायकलवरुन ६६ दिवसांत ३६ जिल्ह्यांचा प्रवास करण्याचे अनोखे अभियान ६६ वर्षीय प्रकाश पाटील यांनी यशस्वी करून दाखवले. आळंदी येथे त्यांच्या या उपक्रमाचा समारोप झाला. या प्रवासादरम्यान आरोग्य, पर्यावरण रक्षण आदी संदेश युवकांमध्ये देखील रुजविण्याचे काम त्यांनी केले.

आपला महाराष्ट्र नेमका कसा आहे ? हे प्रत्यक्ष अनुभवता यावे, यासाठी सायकलवरून भ्रमंती करण्याचे ध्येय प्रकाश पाटील यांनी पाहिले. त्यानुसार, महाराष्ट्रातील ३६ जिल्हे फिरण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. २७ ऑगस्ट २०२३ ला भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी कामगार नेते सचिन लांडगे यांच्या उपस्थितीत या भ्रमंतीला सुरूवात केली. त्यानंतर, रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आदींसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत प्रवेश केला. प्रत्येक जिल्ह्यांत असणाऱ्या तिथल्या वैशिष्‍ट्यपूर्ण स्थळांना भेटी दिल्या.

पाटील यांचा दृष्टीक्षेपातील प्रवास
- एकूण ३६ जिल्ह्यांतून ५ हजार सातशे किलोमीटर प्रवास
- सहाशे १५ किलोमीटर पायी प्रवास
- एकूण ६६ दिवस प्रवास
- गड, किल्ले, पौराणिक मंदिरे अशा ठिकाणी भेटी

दत्त गडावर प्रत्येक जिल्ह्याच्या नावाने वृक्षारोपण...
या प्रवासादरम्यान पाटील हे प्रत्येक जिल्ह्यातून माती व पाणी घेऊन आले आहेत. त्या त्या जिल्ह्याच्या नावाने दिघीतील दत्त गडावर वृक्षारोपण करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या आराखड्याप्रमाणे प्रत्येक शहराच्या नावाने वृक्ष लागवड त्याच जिल्ह्याच्या व्यक्तीच्या हातून करण्याचा पाटील यांचा मनोदय आहे.


प्रकाश पाटील यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी महाराष्ट्रभर केलेला सायकल प्रवास थक्क करणारा आहे. ध्येयवेडी माणसेच अशी कामगिरी करतात.
- आमदार महेश लांडगे

सध्याच्या युगात सर्वांनी आरोग्य जपले पाहिजे. विशेषतः तरुणांनी त्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. या बरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे ही आपली जबाबदारी आहे. सायकलवरून केलेल्या भ्रमंतीवेळी हा संदेश युवकांमध्ये रुजविण्याचे काम केले. - प्रकाश पाटील, सायकल मित्र, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.