भोसरीत मुसळधार पावसामुळे नागरिकांचा तारांबळ..

भोसरीत मुसळधार पावसामुळे नागरिकांचा तारांबळ..

भोसरी, ता. १६ ः भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी परिसरात गुरुवारी (ता. १६) सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची धांदल उडाली. साधारण सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरु झाला. आणि सव्वा तास पावसाची संततधार सुरु होती. पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागली.
भोसरीतील पीएमटी चौक, भोसरी गावठाणातील मारुती मंदिर, पीसीएमसी चौक, बापूजी बुवा चौक, शांतीनगरमधील रस्ता क्रमांक एक, दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्क, भोसरी-आळंदी रस्ता चौक, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर, चक्रपाणिवसाहतीमधील रस्ता, लांडेवाडीतील ऐतिहासिक प्रवेशद्वारासमोर पुणे नाशिक महामार्ग, इंद्रायणीनगरातील महापालिकेच्या वैष्णोमाता शाळेसमोरील रस्ता, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलसमोरील रस्ता, संतनगर चौक, दिघीतील सह्याद्री कॉलनी क्रमांक तीनसमोरील रस्ता, आदर्शनगरमधील रस्ता, छत्रपती संभाजी महाराज चौक ते विठ्ठल मंदिर चौकापर्यंतचा रस्ता, मॅगझीन चौक, भोसरी आळंदी रस्त्यावरील बनाचा ओढा आदी भागातील रस्त्यावर जागोजागी पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागली.

पावसासह जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे पीएमटी चौकातील पथारीवाल्यांनी पावसापासून बचावासाठी उभारलेल्या ताडपत्री उडून गेल्या. अचानक आलेल्या पावसाने ग्राहक आणि रस्त्यावर बसणारे विक्रेते यांची धावपळ झाली. ग्राहक आणि नागरिकांनी पावसापासून बचावासाठी राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली आश्रय घेतला.

वीज पुरवठा खंडित
जोरदार पावसाला सुरुवात झाल्यावर पीएमटी चौक, भोसरी गावठाण, सम्राट अशोकनगर आदी भागांसह इतर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांच्या समस्येत आणखी भर पडली.

प्रचंड वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मोशी, डुडुळगाव, चऱ्होली परिसरात मुसळधार पावसाचा तासभर धुमाकूळ ...
प्राधिकरणातील नागरिकाच्या सदनिकेच्या गच्चीवरील पत्राशेड उडून खाली पडले...


मोशीत मुसळधार अवकाळी पावसाने धुमाकूळ
मोशी : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी, डुडुळगाव, चऱ्होली परिसरात वेगाने वाहणाऱ्या सोसायटीच्या वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने तासभर धुमाकूळ घातला. आज सायंकाळी चार वाजता पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांचा खोळंबा झाला. सकाळपासूनच वातावरणातील तडाख्याचे ऊन आणि उष्णता कमी होऊन गारवा जाणवत होता. शहरातील विविध भागासह मोशी, मोशी प्राधिकरण, डुडुळगाव, चऱ्होली परिसरात देखील दुपारी झाला.

नागरिकांची तारांबळ..
मोशी प्राधिकरणातील एका नागरिकाच्या सदनिकेच्या गच्चीवरील पत्राशेड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे उडून खाली पडले.
तर चऱ्होली परिसरातील होर्डिंगवरील फ्लेक्स फाटले. परिसरातील रस्त्यांना ओढ्यानाल्यांचे स्वरूप आले होते. शेतांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. दुचाकीसह वाहनचालक सावधानतेने या पाण्यातून रस्ता काढत होते. येणाऱ्या नांगरणीसाठी झालेला पाऊस उपयुक्त आहे. मात्र, काढणीला आलेल्या वांगी, कारली, काकडी आदी तरकारीसाठी उपयुक्त नसल्याचे चऱ्होलीतील शेतकरी ॲड. विष्णू तापकीर, चंद्रकांत येळवंडे, शांताराम वहिले यांनी सांगितले.

पीएमटी चौक, भोसरी : येथील रस्त्यावर जमा झालेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com