तेजज्ञान फाउंडेशनच्या ध्यान महोत्सवाची सांगता

तेजज्ञान फाउंडेशनच्या ध्यान महोत्सवाची सांगता
Published on

भोसरी, ता. २४ : ‘हॅपी थॉट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भोसरीतील विश्‍वास तेजस्थानमध्ये आयोजित ‘रजत जयंती ध्यान महोत्सव सोहोळ्या’ची उत्साहात सांगता झाली.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन समाजसेविका व लघउद्योजिका राजश्री घागरे आणि संत साई इंग्रजी माध्यम शाळेचे संस्थापक शिवलिंग ढवळेश्‍वर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर फाउंडेशनचे सदस्य राहुल काळे यांनी फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री त्यांच्या आध्यात्मिक कार्याची माहिती दिली.
‘‘हातातील मोबाईल काही वेळ बाजूला ठेवून ध्यानात बसल्यास त्याद्वारे आयुष्यात स्वल्पविराम निर्माण होईल आणि आपल्या सर्वोच्च आनंदाचा ‘स्व-अनुभव’ होई,’’ असे काळे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमात तेजगुरू सरश्री यांचा ध्यानावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. यावेळी उपस्थितांना २१ मिनिटांचे ध्यान अनुभवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यात १५०पेक्षा जास्त साधक व नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, ‘द मिरेकल ऑफ ग्रैटिट्यूड’ ग्रंथाचे अनावरण झाले. फाउंडेशनच्या सदस्या रूपाली डिगे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com