ऐन पावसाळ्यात सांडपाणी वाहिनीचे खोदकाम
ऐन पावसाळ्यात सांडपाणी वाहिनीचे खोदकाम
गंगोत्री पार्कमधील रहिवासी त्रस्त ः सोसायट्यांमधून येणे-जाणे अवघड
भोसरी, ता. १७ ः ऐन पावसाळ्यात दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्कमधील रस्त्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेने पावसाळी आणि सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. इमारत आणि बंगल्यासमोरच राडारोडा पडल्याने अनेक सोसायट्यांमधील नागरिकांना येणे-जाणे अवघड झाले आहे. सोसायट्यांमधील भाडेकरू सदनिका सोडून जाणे पसंत करत आहेत.
भोसरीतील दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्कमध्ये बन्सल सिटी ते लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सीमाभिंतीपर्यंत उतार आहे. त्याचप्रमाणे या भागात पावसाळी वाहिनी नसल्याने पावसाचे पाणी सांडपाणी वाहिनीमधून वाहून ते तुंबत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहण्याची समस्या येथे आहे. ही समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने येथे सांडपाणी वाहिनी आणि पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. भोसरीवरून दिघीला जोडणारा गंगोत्री पार्कमधून जाणारा जवळचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र तरीही या रस्त्याच्या देखभालीकडे पिंपरी चिंचवड महापालिकेने दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांना उन्हाळ्यात या रस्त्यावरील धुळीचा; तर पावसाळ्यात रस्त्यावरील पाण्याच्या लोंढ्याचा सामना करावा लागत आहे. आता ऐन पावसाळ्यात येथील कामाला सुरूवात करण्यात आल्याने नागरिकांचा प्रवास खडतरच होणार आहे. तर सोपान रेसिडेन्सी, बन्सल सिटी, रामहिरा रेसिडेन्सी, रामहरी सोसायटी, इंदूबन रेसिडेन्सी आदी सोसायट्यांतील नागरिकांना जाण्या-येण्यात विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांच्या तक्रारी...
- भाडेकरूंकडून सदनिका रिकाम्या, नवीन भाडेकरूंचीही पाठ
- रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संथगतीने; त्यातच वाहतूकही सुरू
- शाळेची बस, कामगारांना घेऊन जाणारी प्रवासी वाहने येणे अशक्य
- कचरा उचलणारी घंटागाडीही येत नाही
- गृहपयोगी वस्तूंची घरपोच डिलिव्हरी होणे अवघड
पिंपरी चिंचवड महापालिकेने गंगोत्री पार्कमधील रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे होते. ऐन पावसाळ्यात काम सुरू केल्याने गंगोत्री पार्क परिसरातील नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
- विनोद कदम, अध्यक्ष, बन्सल सिटी
गंगोत्री पार्कमधील मुख्य रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मागच्या प्रवेशद्वारावरून लहान विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक, महिला सोडतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
- कैलास वडघुले, स्थानिक नागरिक, गंगोत्री पार्क
गंगोत्री पार्कमधील रस्त्यावर दर महिन्याला सांडपाणी वाहिनी तुंबून दुर्गंधीयुक्त रस्त्यावरून वाहते. या त्रासातून सुटका मिळविण्यासाठी दुसरीकडे राहण्यास जाण्याचा विचार सुरू आहे.
- विश्वास काशीद, स्थानिक नागरिक, गंगोत्री पार्क
गंगोत्री पार्कमधील सांडपाणी वाहिनीचे काम चार दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. सध्या त्या ठिकाणी पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाद्वारे सुरू आहे.
- राजेंद्र डुंबरे, उपअभियंता (जलनिस्सारण), ई क्षेत्रीय कार्यालय
BHS25B03013, BHS25B03015
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.