रस्त्यांच्या डागडुजीचे पुन्हा ‘पितळ उघडे’

रस्त्यांच्या डागडुजीचे पुन्हा ‘पितळ उघडे’

Published on

भोसरी, ता. ३० : भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर आणि भोसरी एमआयडीसी परिसरात खड्ड्यांमुळे समस्या वाढल्या आहे. खड्डे चुकवताना वाहन चालकांना अपघातही होत आहे. त्यामुळे आतातरी रस्त्यांची चांगली डागडुजी करण्याची मागणी मागणी जोर धरू लागली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर, भोसरी एमआयडीसीमधील रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजविले नसल्याचे कारण देत महापालिकेने काही कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस बजावली होती. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात त्याच-त्याच रस्त्यांवर वारंवार खड्डे पडत असतानाही पावसाळ्यापूर्वीच डांबरीकरण का करण्यात येत नाही, असा सवाल विचारला जात आहे. पावसाळ्यापूर्वी हे खड्डे खडी, मुरुम, मातीने भरले जातात. पावसामुळे ते रस्त्यावर विखरून पुन्हा खड्डे उघडे पडतात. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत खड्डे बुजविण्याचे काम सुरूच असते. मात्र, वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांच्या नाहक त्रासाला नागरिक आणि वाहन चालकांना सामोरे जावे लागत आहे.
भोसरी एमआयडीसीत ‘जे ब्लॉक’मधील सिप्रा कंपनीसमोर खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने मुरुमासह मोठे दगडही वापरले. मात्र, यातून दुचाकी नेताना चालकांना कसरत करावी लागत आहे.


खड्ड्यांनी चाळण झालेले रस्ते
भोसरी : लांडेवाडीतील पुणे-नाशिक महामार्गावरील ऐतिहासिक प्रवेशद्वार चौक, गावठाणातील मारुती मंदिराजवळ, शांतिनगर क्रमांक तीनसमोर, गवळीनगर, संत तुकारामनगर, संभाजीनगरातील अंतर्गत भाग, चक्रपाणी वसाहतीतील शास्त्री चौकाकडून अक्षयनगर मार्ग, प्रियदर्शनी हायस्कूल चौक, सिद्धेश्वर हायस्कूल चौक, कै. शंकर परशुराम गवळी बॅडमिंटन हॉलमागील परिसर, गंगोत्री पार्क प्रवेशद्वारासमोर, बन्सल सिटी ते बसिल पार्क.

दिघी : इंदुबन रेसिडेन्सीसमोर, सावंतनगर, कमानीसमोर, सह्याद्री कॉलनी क्रमांक तीनजवळ, भारतमानगर कॉलनी क्रमांक एकजवळ, संत निरंकारी भवनजवळ.

इंद्रायणीनगर : पेठ क्रमांक एक- चारभूजा क्लासिक सोसायटीसमोरील रस्ता, आनंददीप सोसायटीसमोर, पेठ क्रमांक दोनमधील प्रा. रामकृष्ण मोरे उद्यानासमोर, नाना-नानीपार्क मार्ग, इमारत क्रमांक ४८जवळ, पेठ क्रमांक सात-महापारेषण कार्यालयाजवळ, यशवंतराव चव्हाण चौक, संकेत हॉटेल ते इंद्रायणी चौक.


भोसरी, दिघीतील रस्त्यावरील खड्डे यापूर्वीच बुजविले होते. मात्र, सध्या पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. तेही बुजविण्याचे काम गुरुवारपासून (ता. ३१) सुरू करण्यात येईल. चक्रपाणी वसाहतीतील शास्त्री चौकातील रस्त्याचे डांबरीकरण रेड झोन आणि मूळ मालकांनी जागेची ताबा न दिल्याने रखडले आहे. गंगोत्री पार्कमधील रस्त्यावरील खड्डेही बुजविण्यात येतील.
- शिवराज वाडकर, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, ‘इ’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालय.

इंद्रायणीनगर, भोसरी एमआयडीसीत खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. छोटे खड्डे कोल्ड मिक्सद्वारे बुजविण्यात येत आहेत. तर, पाऊस सुरू असल्याने मोठे खड्डे मुरुम-मातीने भरण्यात येत आहेत. पावसाने उघडीप दिल्यास रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल.
- सुनीलदत्त नरोटे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, ‘क’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालय.

चक्रपाणी वसाहतीतील शास्त्री चौकाजवळील रस्ता गेल्या पंचवीस वर्षांपासून रखडला आहे. खड्ड्यांमधून रोजच्या प्रवासामुळे पाठदुखीचा त्रास वाहन चालकांना होत आहे.
- शशिकांत देसाई, स्थानिक नागरिक, चक्रपाणी वसाहत.

दिघीतील भारतमाता नगरजवळ सुमारे दीड फूट खोल खड्डा पडला आहे. त्यामध्ये वाहने आदळून घसरत आहेत. चालकांचाही अपघात होत आहेत.
- सुभान देवरे, वाहनचालक.

इंद्रायणीनगरात काही रस्त्यांवर चर खोदल्या आहेत. यातून दुचाकी काढताना अडकून पडते. या चरींचे डांबरीकरण झाले पाहिजे.
- राहुल ठोंबे, वाहनचालक.

BHS25B03148, BHS25B03149, BHS25B03150

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com